26.1 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home महाराष्ट्र राज्यात रुग्णसंख्या 9,328 वर; 4 मंत्रालय कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची पुष्टी

राज्यात रुग्णसंख्या 9,328 वर; 4 मंत्रालय कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची पुष्टी

0
133

मुंबई(विशेष प्रतिनिधी)दि.29. कोरोनाने मंत्रालयातही धडक मारली आहे. मंत्रालयातील 4 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यानंतर पुढील दोन दिवसांसाठी मंत्रालय बंद करण्यात आले आहे. सॅनेटायझेशनसाठी मंत्रालय 29 आणि 30 एप्रिल रोजी बंद राहणार असल्याचे सामान्य प्रशासनाच्या विभागाने सांगितले.राज्यात मंगळवारी ७२९ नवे रुग्ण, तर ३१ बाधितांचा मृत्यू झाला. राज्यातील रुग्णसंख्या ९,३१८ झाली असून बळींचा आकडा ४०१ वर गेला. मंगळवारी १०६ रुग्णांसह आजवर १३८८ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. मंगळवारी एकाच दिवशी मुंबईत तब्बल ३९३ नवीन रुग्ण तर २५ कोरोना बळींची नोंद झाली. पुण्यातही एकाच दिवसात १४३ नवीन रुग्ण आणि ३ जणांचा मृत्यू झाला. नागपुरातही कोरोनाचा दुसरा मृत्यू झाला आहे. मोमीनपुरा वस्तीतील रहिवासी असलेल्या ७० वर्षीय वृद्ध इसमावर २१ एप्रिल पासून इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी एका रुग्णाचा कोरोना तपासणी आहवाल पॉजिटीव्ह आला आहे. मुंबईवरून आलेल्या एका 17 वर्षीय युवतीस कोरोनाची लागन झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

मालेगावात 24 तासांत 48 रुग्ण आढळले, शहराचा सुपर रेड झोनमध्ये समावेश

गेल्या 24 तासांत मालेगाव तालुक्यात कोरोनाचे 48 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहेत. संपूर्ण शहराला सुपर रेड झोनमध्ये टाकण्यात आले आहे. येथे मेडिकल आणि रुग्णालये वगळता सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. नवीन रुग्णांमध्ये 2 पोलिसांचा समावेश आहे. मालेगावात आतापर्यंत 193 लोकांना कोरोना झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. कोटात अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी 100 बस रवाना

राजस्थानच्या कोट्यात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या 100 बसेस रवाना झाल्या आहेत. कोट्याला रवाना होण्यासाठी मंगळवारी रात्रीपर्यंत सर्व 100 एसटी बस तयार करण्यात आल्या आणि बुधवारी सकाळई धुळे जिल्ह्यातून रवाना होतील. ज्या मार्गाने बस गाड्या जाणार आहेत त्याच मार्गाने परत येणार आहे. राज्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना 14 दिवसांसाठी क्वारंटाइन केले जाईल. यानंतर पुन्हा चाचणी करून घरी पाठवण्यात येईल.

महाराष्ट्रातील रुग्णांचा तपशील

मुंबई ६१६९, ठाणे ४५, ठाणे मनपा ३४४, नवी मुंबई मनपा १४२, कल्याण डोंबिवली मनपा १५३, उल्हासनगर मनपा ३, भिवंडी-निजामपूर १४, मीरा भाईंदर १२३, पालघर ४१, वसई विरार १२३, रायगड २२, पनवेल ४४, नाशिक ३१३, पुणे १२८८, कोल्हापूर ४८, औरंगाबाद मंडळ १०८, लातूर मंडळ १९, अकोला मंडळ- १५५, नागपूर १३९, इतर राज्ये २५.