तिरोडा,दि.30:- पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले असून कोरोणा प्रादुर्भावाने शेतीसहित सर्व उद्योगधंदे बंद असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून एप्रिल महिन्यात नोंदणी झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात सन्मान निधीचा पहिला हप्ता जमा केला परंतु बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्याची माहिती पीएम किसान निधीच्या वेबसाईटवर तपासले असता Ist Installment Payment stoped by state असे संदेश येत असल्यामुळे अशा लाभार्थ्यांना लाकडाऊन परिस्थितीत लाभ दिल्यास शेतकऱ्यांना निश्चितच दिलास मिळेल तेव्हा ज्या लाभार्थ्यांचा पहिला हप्ता राज्याकडून थांबविण्यात आलेला आहे अशा लाभार्थ्यांना तात्काळ लाभ देण्याबाबतचे पत्र तिरोडा गोरेगाव विधानसभेचे आमदार विजय रहांगडाले यांनी जिल्हाधीकारी गोंदिया यांना दिले आहे.





