26.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ सैनिकांच्या मदतीला धावून आले नानाभाऊ

सैनिकांच्या मदतीला धावून आले नानाभाऊ

0
637

भंडारा,दि.३०::देशात कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता संचारबंदी लागु करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ तसेच साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ ची प्रशासनाकडून अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये ओडिसा येथील गंजाम जिल्ह्यात सेना वायु रक्षा प्रशिक्षण वेंâद्र गोपालपूर येथील सेवानिवृत्त सैनिकाच्या मदतीला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी धावून जावून माणूसकी जपली आहे.
कोविड १९ च्या वाढत्या प्रकोपामुळे देशातील स्थिती सध्या आणीबाणीच्या वळणावर आहे. अशा परिस्थितीत ओरीसातील गंजाम जिल्ह्यातील गोपालपूर येथील सेना वायु प्रशिक्षण वेंâद्रात १ एप्रिल २०२० रोजी सेवानिवृत्त झालेले सैनिक अडवूâन पडले आहेत. त्यानी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना इमेलव्दारे महाराष्ट्र राज्यामध्ये परत आणण्याविषयी विनंती केली. याकडे जातीने लक्ष घालून मदत व पुनर्वसन मंत्रालयाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांना सदर सेवानिवृत्त सैनिकाचे विनंतीवजा अर्ज पाठवून त्यावर त्वरीत कारवाई करण्याविषयी सांगितले. कोरोनाच्या प्रादुर्भावात जिथे जनप्रतिनिधी घरात होमक्वारंटाईन झाले आहेत तिथे मात्र कर्तव्यदक्ष विधानसभा अध्यक्ष नाना पटोले नागरिकांच्या मदतीसाठी जातीने लक्ष घालत आहेत आणि प्रकरणे मार्गी लावीत आहेत. कोरोनाच्या दहशतीतही त्यांची कर्तव्यनिष्ठा जागृत आहे आणि याचा प्रत्यय वेळोवेळी येतो.े