43.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी दुकाने सुरू करण्यास सुधारित आदेश

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी दुकाने सुरू करण्यास सुधारित आदेश

0
577

गोंदिया दि.01: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी इलेक्ट्रिक फॅन दुकाने, रेती, सिमेंट, लोहा आणि चश्मा(ऑप्टिकल) दुकाने सुरू करण्यासाठी यापूर्वी आठवड्यातील सोमवार आणि वेळ सकाळी 8 ते दुपारी 2 वाजता दरम्यानची निश्चित केली होती. या दुकानांमध्ये होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी तसेच प्रत्यक्ष परिस्थिती पाहता सदर दुकाने सुरू करण्याच्या दिवसामध्ये वाढ करण्याचे सुधारित आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्ष डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले आहे. त्यामुळे ही दुकाने आता सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजतापर्यंत सुरू राहतील. आदेशातील अटी व शर्तीचे पालन न करणाऱ्या संबंधित व्यक्ती,तसेच दुकानदार /आस्थापना व संस्था यांचेवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे.

blank