तिरोडा,दि.02ः-येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आलेल्या प्रसुती शल्यक्रिया पुर्ववत सुरु करण्यात यावे अशी मागणी कपिल भोंडेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.भोंडेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात कोरोना प्रादुर्भाचे कारण पुढे करुन प्रसुती शल्यक्रिया बंद करण्यात आलेल्या आहेत.जेव्हा की ग्रामीण भागातील अनेक महिला याठिकाणी प्रसुतीसाठी येत असल्याने त्यांची अडचण होत आहे,त्यामुळे त्वरीत उपजिल्हा रुग्णालयात प्रसुती शल्यक्रिया करण्याचे निर्देश द्यावे असे म्हटले आहे.





