25.5 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home मराठवाडा/खान्देश जिल्ह्यातील शेतकरी गटांच्या DPR ला गटशेती योजनेअंतर्गत तात्काळ मंजुरी द्या

जिल्ह्यातील शेतकरी गटांच्या DPR ला गटशेती योजनेअंतर्गत तात्काळ मंजुरी द्या

 जिल्हाधिकारी यांच्याकडे भागवत देवसरकर यांची मागणी

0
106
नांदेड,दि.4:महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागांतर्गत गटशेती योजना 2018- 19 या वर्षात जिल्ह्यात सहा गटांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,नांदेड यांनी पूर्वसंमती दिली होती, त्यानंतर त्या गटांना त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यास सांगितले होते,सविस्तर प्रकल्प आराखडा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे सादर केल्यानंतर डीपीआरला जिल्हास्तरीय कमिटीच्या वतीने मंजुरी देण्यात येत असते.जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिल्यानंतर गटांना त्यांच्या सविस्तर प्रकल्प आराखड्यानुसार योजनांचा लाभ मिळत असतो व त्यानुसार राबवव्याचा असतो,जिल्हास्तरीय कमिटीची  दोन वेळेस बैठक होऊनही अद्यापही जिल्ह्यातल्या पाच गटांना मंजुरी दिली नाही,याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी तात्काळ बैठक घेऊन उर्वरित पाच गटाच्या सविस्तर प्रकल्प आढावा डीपीआर ला मंजुरी देऊन शेतकरी गटास काम करण्याची संधी द्यावी अशी आग्रही मागणी व विनंती यावेळी जिल्हातील सर्व शेतकरी गटाच्या वतीने पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे.
याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, कृषी मंत्री दादाजी भुसे,कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांना निवेदन दिले असल्याचेही भागवत देवसरकर यांनी सांगितले.