27.3 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home Top News अखेर तो नरभक्षक वाघ जेरबंद

अखेर तो नरभक्षक वाघ जेरबंद

0
1166

गोंदिया,दि.०७: — गोरेगाव आणि तिरोडा वनपरिक्षेत्रात गेल्या दोन महिन्यात वाघाने हल्ला केल्यामुळे एक महिला आणि एका पुरुषाला आपले प्राण गमावावे लागले होते.त्यामुळे भविष्यातील मनुष्य प्राणहानी टाळण्यासाठी वन्यजीव विभागाने त्या वाघाला जेरबंद करण्याचा निर्णय घेतला होता.जेरबंद करण्यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी तसेच सुसज्ज रेस्क्यू टीम,नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे
पशुवैद्यकीय अधिकारी तसेच गोंदिया वन विभागाची रेस्क्यू टीमच्या मदतीने त्या वाघाला जेरबंद करण्यात धानुटोला पांगडी गावाजवळ आज सायकांळी ७ च्या सुमारास यश आले आहे.हा वाघ ब्रह्मपुरी वन विभागातून गोंदिया जिल्ह्यात आलेला होता.