गोंदिया,दि.08 : संपूर्ण देशात २५ मार्चपासून संचारबंदी आदेश लागू आहे. १७ मेपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. दरम्यान संचारबंदीच्या काळात अतिआवश्यक व जीवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आदेश आहेत. मात्र अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडून आदेशाचे उल्लंघन करीत असल्याने पोलिस कारवाई करीत आहेत. अशातच ६ मे रोजी जवळपास पोलिसांनी संचारबंदीचे उल्लंघन प्रकरणी १० गुन्हे दाखल केले आहेत. शहर पोलिस ठाण्यांतंर्गत लक्ष्मी टेलीराम सेंटर येथे मोबाईल दुकान उघडून आरोपीने विहित वेळेपेक्षा अधिक वेळ दुकान सुरू ठेवल्याने तर आदर्श सिंधी शाळे जवळ शारीरिक अंतरचे पालन न केल्याने तर जयदुर्गा ड्रेसेस यांनीही विहित वेळेपेक्षा अधिक वेळ दुकान सुरू ठेवल्याने स्पोर्ट चॅनल तसेच कपडा दुकान अधिक वेळ सुरू ठेवल्याने महालक्ष्मी इलेक्ट्रीक गांधी प्रतिमा यांनीही अधिक वेळ दुकान सुरू ठेवल्याने तर रामनगर पोलिस ठाणे हद्दीत मोहफुलाची दारू विक्री करणार्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिरोडा पोलिस ठाणे येथे मिठाईची दुकान सुरू ठेऊन आदेशाचे उल्लंघन केल्याने तर चिचगड पोलिस ठाण्यांतर्गत मोहफुलाची दारू अवैधरित्या विक्री केल्याने अशा प्रकारे नागरिकांनी शासनाने शिथिलतेदरम्यान दिलेल्या मुदतीपेक्षा अधिक वेळ दुकान सुरू ठेऊन तसेच नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी १० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तिरोडातही संचारबंदी आदेशाचे वारंवार होत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील रतनलाल बंदवानी व विजय मोटवानी यांनी विहित मुदतीपेक्षा अधिक वेळ दुकान सुरू ठेऊन कायद्याचे उल्लंघन केले. तसेच आरोपी मोटरसायकल क्र. एमएच. ४९/एव्ही.५५७८ च्या चालकाने विनाकारण रात्रीला मोटरसायकल फिरवून कायद्याचे उल्लंघन केले. तसेच रात्रीच्या परवाना नसतांनाही टिप्पर क्र. एमएच.४०/बीएल.८९५१ च्या चालकाने अवैधरित्या गिट्टी वाहतूक करून कायद्याचे उल्लंघन केले. अशा प्रकारे शहरात संचारबंदी कायद्याचे उल्लंघन झाल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई उद्धव उमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. राहुल साबडे, शिवशंकर शेंडे व इतर कर्मचार्यांनी पार पाडली.





