25.5 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ दस्त नोंदणीचे काम ऑनलाईन पुर्ववत सुरु

दस्त नोंदणीचे काम ऑनलाईन पुर्ववत सुरु

0
87

भंडारा,दि. 9 :-जिल्हयातील दस्त नोंदणीचे काम शासनाने लॉकडाऊन जाहिर केल्यापासून बंद होते.जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भंडारा व नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पूणे यांच्या यांचे आदेशानुसार दस्त नोंदणी कामकाज ऑनलाईन प्रणालीद्वारे पुर्ववत सुरु करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी 27  एप्रिल 2020 चे आदेशान्वये सोशल डिस्टंन्सिंग व शासनाने जाहिर केलेल्या उपाययोजनानुसार दस्त नोंदणीचे कामकाज पुर्ववत सुरु करण्याबाबत परवानगी दिली आहे.

कोरोना विषाणू प्रार्दुभाव असल्यामुळे दस्त नोंदणीचे वेळ नोंदणी विभागाचे www.igrmaharashtra.gov.in   या संकेतस्थळावरील ऑनलाईन सव्हिस या सदराखाली ई-स्टेप इन या पर्यायावर क्लिक करुन टोकन बुकींग हा पर्याय निवडून बुकींग करावी किंवा दुय्यम निबंधक यांचे मोबाईलवर संपर्क साधून वेळ आरक्षित करुन घ्यावी. त्यानंतर कार्यालयात तोंडाला मास्क लावून ठराविक अंतर राखून कार्यालयात येतांना फक्त दस्त प्रवेश करण्यात यावा. पक्षकारांनी स्वत:चा पेन वापरावा. कार्यालयात येतांना फक्त दस्त नोंदणीचे आवश्यक कागदपत्रे तेवढेच आणावेत. बॅग व इतर साहित्य कार्यालयात आणू नये शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी भंडारा यांनी केले आहे.