31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राजकीय भाजप महिला मोर्चाचे निवेदन जिल्ह्यात दारूविक्री त्वरित बंद करा

भाजप महिला मोर्चाचे निवेदन जिल्ह्यात दारूविक्री त्वरित बंद करा

0
320

blank

गोंदिया,दि.10 : कोरोना विषाणूची खबरदारी म्हणून देशासह राज्यात लॉकडाऊन सुरू होते. या अवधीत अतिआवश्यक सेवा वगळता सर्वच प्रतिष्ठाण बंद करण्यात आली होती. दरम्यान तंबाखुजन्य पदार्थ व दारूविक्री प्रतिबंधित करण्यात आली होती. मात्र, जिल्ह्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश होताच शासनाने दारूविक्रीला परवानगी दिली. यामुळे आधिच संकटात सापडलेल्या मध्यमवर्गीय कुटूंबाना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तर गर्दी होत असल्याने विषााणू संसर्गाचा धोका वाढला आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ दारूविक्री बंद करावी, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आले. या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
कोरोना विषाणु मुळे देश व राज्यात संचारबंदी सुरू आहे. यामुळे अनेकांचे हातातील रोजगार गेले. व्यवहार ठप्प पडल्याने त्याचा परिणाम जनजीवनावर पहावयास मिळत आहे. परिस्थिती सावरण्यासाठी शासनाने काही बाबतीत मुभा दिली. व्यवहार सुरु होत नाही की, प्रतिबंधित असलेली दारूविक्री पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आल्याने मध्यमवर्गीय कुटूंब अडचणीत आले आहेत. आधिच रोजगार नसलेले दारूच्या व्यसनापायी अशांतता पसरविण्याची शक्यता आहे. करीता लॉकडाऊन असेपर्यत दारूविक्री बंद करण्यात यावी, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आले. या संदर्भात निवेदन जिल्हाध्यक्ष भावना कदम यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी प्रसिद्धी प्रमुख शालिनी डोंगरे, नगरसेविका अ‍ॅड.हेमलता पतेह, नगरसेविका मैथूला बिसेन उपस्थित होते.
विशेष म्हणजे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अ‍ॅड.माधवीताई नाईक, प्रदेश सचिव सिताताई रहांगडाले, प्रदेश सदस्य रचनाताई गहाणे, सविता पुराम यांच्या निर्देशान्वये गोंदिया जिल्ह्यातील तालुकास्तरावर भाजप महीला मोर्चाच्या वतीने दारूविक्री बंद करण्यात यावी, यासाठी तहसीलदारांना निवेदन दिले जात आहे.

blank