28.4 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home मराठवाडा/खान्देश लिंगापुर येथे अत्याधुनिक सोयीसुविधा सह सुसज्ज मातीपरीक्षण केंद्राची स्थापना

लिंगापुर येथे अत्याधुनिक सोयीसुविधा सह सुसज्ज मातीपरीक्षण केंद्राची स्थापना

शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे व पाण्याचे नमुने तपासण्यात येणार. संचालक भागवत देवसरकर यांची प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती

0
756
नांदेड,दि.10. छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लिंगापूर ता. हदगावच्या वतीने परिसरातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी राष्ट्रमाता जिजाऊ माती परीक्षण केंद्राची सर्व सोयी सुविधायुक्त सुसज्ज व अत्याधुनिक मशिनरी व तज्ञ, प्रशिक्षित मनुष्यबळासह स्थापना केली आहे.शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे व पाण्याचे नमुने तपासले जातील,तपासणी नंतर शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पिकाकरिता कशाची व घटकाच्या कमतरतेनुसार खताची मात्रा व योग्य मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती राष्ट्रमाता जिजाऊ माती व पाणी परीक्षण केंद्राचे संचालक भागवत देवसरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
नांदेड,यवतमाळ,हिंगोली या जिल्हातील अनेक भागातील शेतकऱ्यांना माती परीक्षण केंद्राचा फायदा होणार आहे,सध्या या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर आपल्या शेतामध्ये हळद ऊस केळी सोयाबीन कापूस तूर उडीद मूग व इतर भाजीपाला वर्गीय पिकाची लागवड करत असतात. परंतु अद्यापही या भागातील शेतकऱ्यांमध्ये माती परीक्षण बाबत जनजागृती झाली नाही, परिसरामध्ये माती परीक्षण केंद्र नसल्यामुळे शेतकऱ्यांना नांदेड,हिंगोली,यवतमाळ या ठिकाणी माती परीक्षण करण्यासाठी जावावे लागत होते, याची गरज ओळखून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी लिंगापुर येथे माती परीक्षण केंद्राची स्थापना केली आहे, याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे.
शेतकऱ्यांच्या शेतातील  मातीमधील सर्व घटकाची तपासणी केली जाणार असून तपासणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचा रिपोर्ट देऊन ज्या घटकाची जमिनीत कमतरता आहे. त्यावर योग्य खताची मात्रा सांगून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मातीचे नमुने तपासूनच खरीप हंगामामध्ये पेरणी करावी व आपल्या जमिनीमध्ये कोणत्या घटकाची कमतरता आहे याची माहिती घ्यावी,आवश्यक खत मात्रानुसार आपल्या पिकांना देऊन भरघोस उत्पन्न काढावे यासाठी माती परीक्षण करणे ही काळाची गरज आहे, माती व पाणी परीक्षण करण्यासाठी आमच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा व शेतकऱ्यांना माती परीक्षण केंद्राच्या माध्यमातून खरिप पिकाच्या संदर्भात जनजागृती करण्याचे काम करण्यात येणार आहे,अशी माहिती संचालक भागवत देवसरकर यांनी दिली आहे.