29.8 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home महाराष्ट्र दुसरा कोरोनाबाधित रुग्ण बरा होऊन घरी परतला – जिल्हाधिकारी

दुसरा कोरोनाबाधित रुग्ण बरा होऊन घरी परतला – जिल्हाधिकारी

0
220

सिंधुदुर्गनगरी, दि. ११  जिल्ह्यातील दुसरा कोरोनाबाधित रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. कोरोनाबाधित युवतीचे दोन्ही अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर आज जिल्हा रुग्णालयातून तिला घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली.

जिल्ह्यात एकूण 891 व्यक्ती अलगीकरणात असून 597 व्यक्तींना गृह अलगीकरणात तर 294 व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 770 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 708 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 4 अहवाल पॉजिटीव्ह आले असून उर्वरित 704 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर अजून 62 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील 64 रुग्ण दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज रोजी 4512 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.

आतापर्यंत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जाण्यासाठी 11 हजार 909 व्यक्तींनी जिल्हा प्रशासनाच्या लिंकवर नोंद केली आहे. राज्याबाहेर जाण्यासाठी 14 हजार 818 व्यक्तींनी लिंकवर नोंदणी केली आहे. परराज्यात जाणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या संबंधीत राज्याच्या लिंकवर जाऊन नोदणी करून पास प्राप्त करुन घ्यावयाचा आहे. त्या अनुषंगाने पास मिळण्यासाठी अर्ज केलेल्या अर्जदारांना हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये एसएमएसच्या माध्यमातून संबंधित राज्यांच्या लिंकची माहिती कळवली आहे. जिल्ह्यात परतण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमधून 17 हजार 408 व्यक्तींनी नोंदणी केली आहे. त्यापैकी रेड झोनमधील हॉटस्पॉट व कंटेन्मेंट झोन मधील व्यक्ती वगळून इतर क्षेत्रातील व्यक्तींची माहिती परवानगी देण्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनास कळविले आहे. परराज्यातून जिल्ह्यात परतण्यासाठी 1 हजार 533 व्यक्तींनी नोंद केली आहे. तर राज्याच्या इतर जिल्ह्यांमधून मिळून 663 व्यक्तींना जिल्ह्यात येण्यास परवानगी देण्यात आली आहे.