30.1 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home महाराष्ट्र कोऱ्हाळे येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून संत सोपानकाका पालखीचे दर्शन

कोऱ्हाळे येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून संत सोपानकाका पालखीचे दर्शन

0
6

बारामती, दि. २ : उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार या आज बारामती दौऱ्यावर असताना, पंढरपूरची वारी पूर्ण करून परतीच्या मार्गावर असलेल्या संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचे बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे येथे मनोभावे दर्शन घेतले.यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनी पालखी सोहळ्याला वंदन करत संत परंपरेप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. तसेच वारकरी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या प्रवासाची व वारीतील अनुभवांची माहिती जाणून घेतली.

वारकरी संप्रदायाने जपलेली भक्ती, समता आणि समाजप्रबोधनाची परंपरा ही महाराष्ट्राची अमूल्य सांस्कृतिक ओळख असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी सांगितले. संतांच्या विचारांतून समाजात ऐक्य, सद्भावना आणि सेवाभावाची प्रेरणा मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.या प्रसंगी स्थानिक पदाधिकारी, अधिकारी, नागरिक आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.