26.3 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home राजकीय कोरोनाविषयी सक्षम आरोग्य यंत्रणा करा-आ.चंद्रीकापुरे

कोरोनाविषयी सक्षम आरोग्य यंत्रणा करा-आ.चंद्रीकापुरे

0
151

अर्जुनी मोरगाव,दि.१2: गोंदिया जिल्हा कोरोना विषयक ग्रीन झोनमध्ये आहे. त्यात अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रात प्रादुर्भाव आढळला नाही. परंतु आता खरा धोका उत्तरार्धात असल्याने आरोग्य यंत्रणेनी सज्ज राहावे. त्याचप्रमाणे सामाजिक जिवनात फिजिकल डिस्टसींग कायम ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस विभागाने सुद्धा दक्ष राहण्याचे निर्देश अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहरराव चंद्रीकापुरे यांनी दिले आहे.
अर्जुनी-मोरगाव येथील उपविभागीय कार्यालयात कोरोना सांसर्गीक बिमारी विषयक आढावा सभेचे आयोजन करण्यात आले असता आ.चंद्रीकापुरे मार्गदर्शन करताना बोलत होते.कोरोना महमारीचे युद्धाचे सरतेनापती डॉक्टर, पोलीस व स्वच्छता कर्मचारी ठरले आहेत. आपल्या क्षेत्रात अद्याप महामारीचा शिरकाव झाला नसला तरी आपण सदैव सज्ज राहायला हवे. क्षेत्रात विविध ठिकाणी विलगीकरण कक्षाची निर्मिती केली असून त्यामध्ये साहित्य, वैद्यकीय उपकरणे अद्यावत ठेवावीत यासाठी आपण खासदार प्रफुल्ल पटेल, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राज्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य सचिव व्यास यांच्याकडे मागणी केली असून वैद्यकीय अधिकारीचे रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे सांगितले.
राज्यातील व राज्याबाहेरील शिक्षण, रोजगार व इतर कामाविषयक गेलेले आपल्या मुळगावी परत येत आहेत. त्यांची पहिल्यांदा आरोग्यविषयक तात्काळ माहिती घेवून शाळेत किंवा शक्य असल्यास घरीच विलगीकरण कक्षात ठेवावे. या रणसंग्रामात आपल्या ग्रामीण भागातील आंगणवाडी सेवीका, मदतनीस, आशा वर्कर, नर्स या सुद्धा रणयोद्धा ठरल्या आहेत. गावखेड्यात या गावातील बाहेरगवातून आलेल्या व्यक्तीची खडानखडा माहिती यंत्रणेला पुरवित असल्याने त्या अभिनंदनीय कार्य करीत असल्याचे म्हणाले.
स्थलांतरण करुन इच्छिणाèयांसाठी शासन बसव्यवस्था व इतर दळणवळणाची साधणे उपलब्ध करुन देणार आहे. व्यक्तीगत स्तरावर शासनाच्या साईटवर ई-पास उपलब्ध असून ऑनलाईन अर्ज करावे यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र अधिकाèयांनी द्यावे पोलीस व महसूल प्रशासनानी सुद्धा सहकार्य करण्याचे संबंधितांना निर्देश दिले. क्षेत्रामध्ये सद्या पिक काढणी मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहेत. क्रमाक्रमाणे बाजारपेठ सुद्धा खुली होत आहे. पुर्वीप्रमाणे सर्व व्यवहार सुरु होत आहेत. परंतु सामान्य नागरिकांनी फिजिकल अंतर कायम ठेवावे, प्रशासनाशी सलोखा कायम ठेवावा, गर्दी टाळावी.यावर्षी ऐन लग्नसभारंभाच्य वेळीच महामारीने उग्र रुप धारण केल्याने संपूर्ण जग थांबलेत. त्यामुळे शासकीय नियमांना कायम ठेवून ठरावीक लोकांमध्येच लग्न व इतर कार्य शासन नियमानुसार उरकवून टाकावेत. श्रम, पैसा वेळेची बचत करण्याची सवय आता कायम करण्याचे आवाहन यावेळी आ.चंद्रीकापुरे यांनी केले. आढावा सभेला उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसीलदार विनोद मेश्राम, नायब तहसीलदार गेडाम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. घरतकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय राऊत, गटविकास अधिकारी अंदेलवाड, न.प.च्या मुकाअ बगळे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष लोकपाल गहाणे, उध्दव मेहेंदळे, रतीराम राणे, राकेश जायस्वाल, योगीराज हलमारे, सोमा नरवास व इतर उपस्थित होते.