26.3 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home राजकीय मुरमाडी/ सावरी जि. प. क्षेत्रात जीवनावश्यक साहित्य किट वाटप

मुरमाडी/ सावरी जि. प. क्षेत्रात जीवनावश्यक साहित्य किट वाटप

0
203

साकोली,दि.12ः तालुक्यातील मुरमाडी/ सावरी जि. प. क्षेत्रात मतदारसंघाचे आमदार व विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले मित्र परिवारातर्फे जीवनावश्यक साहित्याच्या किटचे वितरण करण्यात आले. यावेळी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष एड. शफीभाई लद्धानी, लाखनी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजु निर्वाण, महादेवजी गायधनी, डॉ. चंद्रकांत निंबार्ते, जि.प. सदस्य आकाश कोरे, मुरमाडी ग्रामपंचायतच्या सरपंचा सौ. सुनिता भालेराव ग्रां. पं. सदस्य विकास वासनिक, कैलास लुटे, निलेश गाढवे, प्रिया खंडारे, सविता गौरे, शांता भोसकर, माधवी बावनकुळे, अल्का चोले आणि जि.प. क्षेत्रातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.