25.5 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home रोजगार/व्यापार अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला व क्रीडा मंडळाच्या ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेत राजकोंडवार...

अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला व क्रीडा मंडळाच्या ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेत राजकोंडवार प्रथम

0
104
गडचिरोली,दि.15ः-लॉकडाऊनच्या काळात शिक्षकांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून अखिल भारतीय  शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ शाखा गडचिरोलीच्यावतीने ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये राजू राजकोंडावार प्रथम, दुशांत निमकर द्वितीय व कवेश दंडिकवार  यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाचे जिल्हाध्यक्ष किशोर बळीराम चलाख यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित प्रश्नमंजुषा तयार केली होती. विजेत्यांना ऑनलाइन प्रमाणपत्राचे वाटप  करण्यात आले. सदर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सचिव माणिकचंद रामटेके,उपाध्यक्ष जितेंद्र रायपुरे ,सरचिटणीस मारोती अारेवार, कार्याध्यक्ष अनिल चांदेकर
यांचे मोलाचे सहकार्य केले.स्पर्धेच्या यशस्वितेसाठी अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाचे राज्याध्यक्ष नटराज मोरे  व प्रसिद्धी प्रमुख सचिन कुसनाळे  यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.