26.3 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ मुख्यमंत्री सहायता निधीला ग्रंथमित्र भाऊ पत्रेकडून एक लाखाची मदत

मुख्यमंत्री सहायता निधीला ग्रंथमित्र भाऊ पत्रेकडून एक लाखाची मदत

0
69

गडचिरोली,दि.15ः-कोरोना महामारीचा प्रकोप निवारण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत ग्रंथमित्र प्राचार्य भाऊ पत्रे यांनी आपल्यावतीने एक लाख रूपये निधीचा  धनादेश जिल्हाधिकारी दिपक सिंगलांच्या स्वाधीन केला. याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूड,डी.डी.रेड्डी प्रामुख्याने उपस्थित होते.
प्राचार्य पत्रे हे राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांच्या विचारांने प्रेरित असून शासनमान्य शिक्षक भारती ह्या संघटनेचे विभागीय अध्यक्ष आहेत. सेवाभावी वृत्तीने यापुर्वीही आलेल्या किल्लारी भुकंप, कारगील युध्द , नैसर्गिक आपत्ती प्रसंगी त्यांनी स्वयंस्फुर्त शासनाला आर्थिक मदत केलेली आहे.प्राचार्य पत्रे यांनी सामाजिक जाणिवेतून केलेल्या स्वयंस्फुर्त कार्याचे शिक्षक आ. कपील पाटील,प्रा.राजेंद्र झाडे,ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, ईश्वर राऊत,हितेंद्र दुपारे तसेच शिक्षक भारतीच्या सर्व सदस्यांनी पत्रे यांचे कौतुक केलेले आहे.