33.9 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Top News मांडवीतील पापुयोच्या विहिरीत टाकला थायमेट

मांडवीतील पापुयोच्या विहिरीत टाकला थायमेट

0
310

तिरोडा,दि.१५ : तालुक्यातील मांडवी येथील पाणी पुरवठा करणार्‍या विहिरीत थायमेट टाकल्याने तो पाणी दूषित होऊन ५ ते ६ इसमांची प्रकृती खालावल्याची घटना आज (दि.१५) दरम्यान उघडकीस आली.
सविस्तर असे की, गावातील पाणी पुरवठा करणार्‍या विहिरीत अज्ञात इसमांनी विहिरीत कीटकनाशक औषध असलेली थायमेट टाकला. दरम्यान आज सकाळी काही नागरिक विहिरीवर पाण्यासाठी गेले असता त्यांना वास येऊ लागली. काही नागरिकांनी या पाण्याचे सेवन केल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. या सर्वांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणल्यानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली. सन २००७ पासून मांडपी येते पाणी पुरवठा योजना सुरू आहे. ही विहिर गावातील झनकलाल माहुले यांच्या शेतात आहे. दरम्यान काही अज्ञात इसमांनी १४ मे च्या रात्रीला विहिरीत थायमेट टाकले. गावातील अनिल मारबते, शैलाबाई मारबते, जयप्रकाश केवट व अन्य लोकांनी पाण्याचा सेवन केला असता थायमेटची वास येऊ लागल्याने गावात चांगलीच खळबळ माजली. पाणी सेवन केलेल्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान उपचारानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली. या प्रकारामुळे भर उन्हाळ्याच्या दिवसात गावात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होणार आहे. तेव्हा हे कृत्य करणार्‍यावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच पाणी पुरवठा योजनेला अद्यापही अधिकृत विद्युत विभागाचे मिटर नसल्याने कृषी पंपावरच पाणी पुरवठा होत आहे, तेव्हा विद्युत विभागानेही याकडे लक्ष द्वावे, अशी मागणी होत आहे.

blank