26.3 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home Top News ग्रीन झोन असलेल्या गडचिरोलीत बाहेरुन आलेल्या पाच जण पॉझिटीव्ह

ग्रीन झोन असलेल्या गडचिरोलीत बाहेरुन आलेल्या पाच जण पॉझिटीव्ह

काल रात्री उशिरा आले अहवाल तीनही व्यक्ती जिल्हयाबाहेरून आलेले

0
1786

गडचिरोली (दि.18 मे ) :ग्रीनझोन असलले्या गडचिरोली जिल्हयात बाहेरून आलेल्या व प्रशासनाकडून संस्थात्मक क्वारंटाइन केलेल्या पाच प्रवाशांचे कोरोना कोविड नमुने काल रात्री पॉझिटीव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यात कुरखेडा येथील चार, तर चामोर्शी येथील एका प्रवाशाचा समावेश आहे.यामुळे जिल्हा आता आरेंजझोनमध्ये गेल्याने ग्रीनझोनमधील सर्व सवलतीवंर निर्बंध येणार आहेत.

काही दिवसांपूर्वी शासनाने विविध जिल्ह्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या स्वजिल्ह्यात येण्याची परवानगी देणे सुरु केल्यानंतर अनेक जण जिल्ह्यात आले आहेत. त्यात विद्यार्थी, कर्मचारी, व्यावसायिक व मजुरांचाही समावेश आहे. असेच काही मजूर १६ मे रोजी मुंबई येथून कुरखेडा व चामोर्शी येथे आले. आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. काल रात्री उशिरा नमुना अहवाल प्राप्त झाला. त्यात कुरखेड्यातील दोन जणांचा, तर चामोर्शी येथील एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आज पहाटे तिन्ही कोरोनाबाधित व्यक्तींना जिल्हा रूग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात हलविण्यात आले. त्यानंतर आज दुपारी पुन्हा कुरखेड्यातील दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. हे दोघेही पहिल्या रुग्णासोबतच संस्थात्मक क्वारंटाईन होते. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेश वॉर्डात हलविण्याची प्रक्रिया सुरु केल्याची अधिकृत माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.

संबंधित रूग्णांकडून त्यांच्या प्रवासाचे तपशिल घेणे सूरू आहे.  पाच जण कोरोना पॉझिटीव्ह झाल्याने आता गडचिरोली जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमधून ऑरेंज झोनमध्ये झाला आहे. जिल्हयातील नागरिक व बाहेरून आलेल्या प्रवाशांनी अधिक काळजी घेणे आता गरजेचे आहे. सर्वांनी प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे, असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.