आमगाव:- देशात कोरोना १९ या महाभयंकर संसर्ग रोगाने थैमान घातले आहे.त्यापासून बचाव करण्यासाठी लाॅकडाऊन हा एकमेव पर्याय पुढे असतांनाही तो संसर्ग अधिक पसरू नये म्हणून अनेक संघटना मदतीला पुढे आल्या आहेत.पोलीस, स्वास्थ विभागा सोबतच पत्रकार संघटना सुद्धा यात आपले योगदान देत आहेत.या पत्रकारांना त्याची लागण होऊ नये म्हणून त्यांची तपासणी व प्रतिबंधात्मक औषधांचे वितरण गोंदिया होमिओपॅथिक मेडीकल काॅलेज व हास्पिटल गोंदिया च्या वतीने करण्यात आले.
या काॅलेज च्या प्राचार्या डाॅ हर्षा कानतोंडे यांच्या मार्गदर्शनात डाॅ रोशन कानतोंडे,डाॅ नेहल कुंभलकर,डाॅ शिवानी विभूते,डाॅ साक्षी तिवारी,डाॅ रिचा कोडवानी,डाॅ रूचिता जगवानी या चमूने पोलीस स्टेशन आमगाव १७ मे ला पत्रकार संघाचे अध्यक्ष इसूलाल भालेकर,उपाध्यक्ष झेड एस बोरकर,सचीव राधाकिसन चुटे, कोषाध्यक्ष सुनिल क्षिरसागर,अजय खेतान,सुनिल पडोळे,रितेश अग्रवाल,नरेंद्र कावळे,राजू फूंडे,दिनेश शेंडे,आनंद शर्मा,विकास शर्मा,रेखलाल टेंभरे,महेश मेश्राम यांची चाचणी केली व प्रतिबंधात्मक होमिओपॅथीक औषधीचे वाटप केले तथा या ससंर्गापासून बचावात्मक उपायावर चर्चा केली.





