40.3 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home Top News ग्रीन झोनमधून गोंदिया,आँरेंज झोनमध्ये,नवे 2 रुग्ण आढळले

ग्रीन झोनमधून गोंदिया,आँरेंज झोनमध्ये,नवे 2 रुग्ण आढळले

0
6301

blank

गोंदिया,दि.19ः गेल्या 38 दिवसापासून ग्रीनझोनमध्ये असलेला गोंदिया जिल्हा 39 व्या दिवशी परत आँरेंज झोनमध्ये आलेला आहे.गोंदियात पाॅझिटिव्ह निघालेला युवक करोनामुक्त झाल्यानंतर जिल्हा ग्रीनझोनमध्ये आलेला होता.मात्र आज अर्जुनी मोरगाव व आमगाव तालुक्यातील 2 व्यक्ती पाॅझिटिव्ह आल्याचा अहवाल आल्याने खळबळ माजली आहे.तसेच करोना रुगणांच्या संख्या पुर्वीचा निगेटिव्ह झालेला 1 आणि आज निघालेले 2 असे 3 झाली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील करांडली व आमगाव तालुक्यातील आमगाव येथील बाधीत व्यक्तींचा समावेश आहे.दरम्यान अर्जुनी मोरगाव उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी करांडली हे कंटेनमेंट घोषीत केले असून त्यासोबतच परिसरातील बोंडगावसुरबन,केऴवद,सुरबंद,तुकुमनारायण,दिनकरनगर व जरुफाटा या गांवाना बफर झोन जाहिर करीत या गावांच्या सीमा सिल करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

अर्जुनी मोरगाव आणि आमगाव तालुक्यातील या दोन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. सदर दोन्ही व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील करांडली येथील व्यक्ती हा मुंबईतील चेंबूर येथून ट्रकने गडचिरोली जिल्ह्यातील मजूरांसोबत आला होता. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील जो मजूर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यांच्यासोबत तो ट्रकमध्ये आल्याने त्याला कोरोनाचा संसर्ग झाले असावे असा अंदाज आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील रुग्ण हा सहा दिवसापुर्वी लग्नाकरीता आपल्या गावी आलेला होता.गावी आल्यानंतर त्याला शाळेतच क्वारंटाईन करण्यात आले होते.मात्र दोनदिवसापुर्वी त्याच्यात लक्षणे आढळल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आल्यानंतर त्याचे नमुणे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते,त्याच अहवाल आज पाॅझिटिव्ह आला आहे.

तर दुसरा रुग्ण आमगाव तालुक्यातील असून तो गोंदियातील जिल्हाक्रिडा संकुलातील शासकीय अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे.आमगाव तालुक्यातील जी व्यक्ती पाॅझिटिव्ह आलेली आहे,ती 22 वर्षीय परिचारिका असून मुंबई येथील खासगी रुग्णालयात कार्यरत होती.पाच ते सहा दिवसापुर्वी गावाला परत आल्यावर नागरिकांनी क्वारंटाईनचा सल्ला दिल्याने तिला जिल्हाक्रिडा संकुलात ठेवण्यात आले होते,तीचा अहवाल आज पाॅझिटिव्ह आलेला आहे. जिल्हा प्रशासन गोंदिया जिल्हा ग्रीन झोनमध्ये ठेवण्यासाठी अथक परिश्रम घेत असताना एक पुन्हा कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याने परिश्रम व्यर्थ ठरले आहे.

जिल्ह्यातील एकूण ४३३ व्यकतींच्या घशातील स्त्रावाचे नमुने  चाचणीसाठी नागपूर येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.त्यापैकी ३७२ व्यक्तीच्या घशातील स्त्रावांच्या नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला असून यामध्ये ३६९ नमुन्यांचा चाचणी अहवाल नकारात्मक तर ३ नमुने सकारात्मक आले आहे.
१९ मे रोजी नागपूर येथील  विषाणू चाचणी प्रयोगशाळेत ६१ व्यक्तीच्या घशातील स्त्रावाचे नमुने पाठविण्यात आले.एकूण ६१ नमुन्यांचा चाचणी अहवाल प्राप्त व्हायचा आहे.