अर्जुनी मोरगाव,दि.21ः-अर्जुनी-मोर तालुक्यातील करोना रुग्ण आढळलेल्या करांडली या कंटेनमेंट झोन गावासह शेजारील गावांना भेट देऊन नाकाबंदी व इतर गोष्टींची पाहणी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी आज(दि.21)केली.यावेळी आपत्कालीन व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना करोनासंसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासोबतच फिजिकल डिस्टंसचा वाप करण्याच्या सुचना केल्या.हेवेदावे राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी सहकार्य करावे तसेच प्रत्येकांनी स्वतःची व इतरांच्या आरोग्याचीक काळजी घ्यावे असे आवाहन केले.यावेली त्यांच्यासोबत केशोरी पोलीस ठाण्याचे अधिकारीही उपस्थित होते.





