मुंबई, दि. २५ : महान योद्धा महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीदिनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी विशेष कार्य अधिकारी श्री.चंदनशिवे, कक्ष अधिकारी ल.ना.सदाफुले तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन
मुंबई, दि. २५ : महान योद्धा महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, महाराणा प्रतापसिंह यांच्याकडून आपल्याला पराक्रमाचा महान वारसा मिळाला आहे. त्यांनी मातृभूमीसाठी लढताना पराकोटीचा स्वाभीमान जपला. त्यासाठी प्राणही पणाला लावले. त्यांचा हा पराक्रम आजच्या घडीला निश्चितच प्रेरणादायी आहे. या महान योद्ध्याला शतशः नमन.
महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन
वाशिम, दि. २५ (जिमाका) : महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अपर्ण करून अभिवादन केले.यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.



