अर्जुनी मोरगाव,दि.25ः जगभरात वाढणाऱ्या कोरोनाव्हायरस विषाणूचा प्रसार आता आपल्या जिल्ह्यात वाढत जात आहे,या विषाणूला हद्दपार करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आपला जीव मुठीत घेऊन अहोरात्र मेहनत घेत आहेतच मात्र नागरीकांनी सुद्धा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आपली सामुहिक जबाबदारी स्विकारली तर लवकरच कोरोनामुक्त होता येईल असे मत माजी जि.प.उपाध्यक्षा रचना गहाने यांनी केले.
तालुक्यातील ग्राम पंचायत येरंडी,देउलगाव,बाराभाटी, सुकळी,कुंभिटोला,कवठा येथे आपल्या स्थानिक विकास निधीतून मास्क सॅनिटायझर इतर आवश्यक आरोग्यविषयक उपकरणांचे वाटप केले त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी रघुनाथ लांजेवार,सरपंच लालजी चंदेल सुकळी सरपंच,कांचन उके उपसरपंच सुकळी,रेखा खोब्रागडे येरंडी,उपसरपंच लक्ष्मन बागडे,ग्रामसेवक साकुरे,सरपंच ज्ञानेश्वर चौधरी कवठा,कल्पना संग्रामे,सरपंच सौ राठोड बाई कुंभिटोला,सरपंच सौ अनिता वाल्मिक खोब्रागडे, होमराज पुस्तोडे,विनोद नाकडे,व्यंकट खोब्रागडे ई मान्यवर उपस्थित होते.
जगभरात कोरोना विषाणूचा फैलाव होत असून आपल्या तालुक्यात त्याचा मोठा संसर्ग वाढत जात आहे,याला रुद्र रूप मिळू नये याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी.परराज्य,परजिल्हा व अन्य भागातून जिल्ह्यात येणा-या नागरिकांची प्रशासनाने माहीती घेऊन त्याचा अहवाल जिल्हास्तरावर पाठवावा. खबरदारीच्या दृष्टीने त्यांनी आरोग्य तपासणी करावी. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे. सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी आपापल्या मुख्यालयातच राहावे. गर्दीच्या ठिकाणी आरोग्य पथके तैनात ठेऊन बाहेरून येणा-या नागरिकांची तपासणी करावी असेही त्या म्हणाल्या.





