37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home राजकीय विलगिकरण केंद्रावर सुविधा पुरविण्याची मुख्यमंत्र्यांकडे आ.अग्रवालांची मागणी

विलगिकरण केंद्रावर सुविधा पुरविण्याची मुख्यमंत्र्यांकडे आ.अग्रवालांची मागणी

0
379

blank

गोंदिया,दि.25ः येथील करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी सीसीसी सेंटर उभारण्यात आले.परंतु सदर विलगीकरण केंद्रामध्ये सुविधांचा अभाव असल्यामुळे दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सोबतच विलगिकरण केंद्रावर असुविधांचा डोंगर असल्याने त्या केंद्रावर तत्काळ सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावे या मागणीचे पत्र आमदार विनोद अग्रवालांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पाठविले आहे.
विशेष म्हणजे विलगीकरण केंद्रात असणा्या संशयित रुग्णांना योग्य मार्गदर्शन आणि माहिती मिळत नसल्यामुळे त्यांचे रूपांतरण करोना बाधितामध्ये होत असून संख्या वाढत असल्याचेही म्हटले आहे. त्यासाठी एमबीबीएस डॉक्टरांना नियुक्त करून मार्गदर्शन करण्यासाठी नियुक्त करण्यात यावी अशी मागणी आमदार अग्रवाल यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. सोबतच विलगीकरण केंद्रावर काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांची चक्राकार पद्धतीने ड्युटी लावण्यात यावी.7 दिवसाचे काम आणि 7 दिवसाचे पगारी रजा देण्यात यावे.अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी उच्च गुणवत्तेच्या PPE किट व N – 95 मास्क पुरवण्यात यावे. Covid-19 सेंटरवर प्रत्येक दिवशी सॅनिटायझरचे वापर करून स्वच्छतेची काळजी घेण्यात यावी. आयसोलेशन वार्ड आणि करोना सदोष व्यक्ती आणि करोना बाधित रुग्ण यांना एकत्र न ठेवता वेगळे ठेवण्यात यावे. रुग्णांसाठी वेळोवेळी जेवणाची सोय व उत्कृष्ट दर्जाचे जेवण नाश्ता आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी असेही मागणी यावेळी करण्यात आली. विशेष म्हणजे मरारटोली येथील विलगीकरण केंद्रामध्ये अति निकृष्ट दर्जाचा नाश्ता आणि जेवण मिळत असल्याच्या तक्रारी रुग्णांकडून केल्या जात आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम पडत असून त्यांचे आरोग्य दिवसेंदिवस खालावत चालले असून रोगप्रतिकारशक्ती खालावत असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे तात्काळ त्यांना योग्य नाश्ता आणि जेवणाची सोय पुरवत आरोग्यवर्धक औषधांचाही त्यांच्या जेवनाच्या माध्यमातून वापर करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची मागणी आमदार विनोद अग्रवाल यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

blank