26.3 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ गडचिरोलीत 9 जणांचे अहवाल पाॅझीटीव्ह,संख्या 24 वर

गडचिरोलीत 9 जणांचे अहवाल पाॅझीटीव्ह,संख्या 24 वर

0
299

गडचिरोली,दि.२५ : जिल्ह्यात आज आलेल्या अहवालात 9 जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने  आता पॉझिटीव्ह रुग्णांची  एकूण  संख्या  24  झाली आहे.हे नऊ जण मुंबईहुन आलेले असून यांना भामरागड आणि एटापल्ली येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.काल (ता.२४ )रात्री दहा वाजता  प्राप्त अहवालानुसार आढळलेले दोन रुग्ण अहेरी तालुक्यातील असून, ते मुंबईहून आले होते. त्यांना संस्थात्मक विलीगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते, त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची एकूण संख्या 24 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. १७ मे च्या रात्री प्राप्त झालेल्या अहवालात पहिल्यांदा कुरखेडा तालुक्यातील २ व चामोर्शी तालुक्यातील १ असे ३ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले होते. त्यानंतर ही संख्या सातत्याने वाढत चालली आहे.