गोंदिया,दि.२७(बेरार टाईम्स विशेष)– या जगात कल्पनाशक्तीला कुठलीही सीमा नाहीच. कधीकाळी कुणी केलेली कल्पनेतील गोष्ट जशीच्या तशी घडेल सांगता येत नाही,अशी अनेक उदाहरणे जगासमोर आहेत.कधीही न बुडणारे टायटॅनिक जहाज हे बुडण्याच्या १४ वर्षाच्याआधी मॉर्गन रॉबर्टसन यांनी त्यांच्या ‘द रेक ऑफ टायटन’ या कादंबरीत या घटनेचा हुबेहूब उल्लेख केला होता. सध्या जगभरात करोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. जागतिक महासत्ता अमेरिकेसह इटली, स्पेन, भारत, चीनसह अन्य देशांना या व्हायरसचा तडाखा बसला आहे.देशात २१ दिवसांनंतरच्या सततच्या लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. एका व्हायरसमुळे मानवजातीची अपरिमित हानी झाली आहे. लोक घरात बंदिस्त जीवन जगताहेत. तसा वायरस हा विषय सिनेसृष्टीला नवीन नाही.
त्यातही व्हॉलिवुड चित्रपटांमध्ये अज्ञात व्हायरस किंवा साथीच्या रोगाचा प्रसार या विषयावर आत्तापर्यंत अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.करोनाच्या पाश्र्वभूमीवर त्याच्याशी मिळता-जुळता चित्रपट २०११ मध्ये प्रदर्शित झाला आहे.कंटेजन हा व्हॉलिवुड चित्रपट सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.चीनमधून अमेरिकेत आलेला व्हायरस लाखो लोकांचे बळी कसा घेतो आणि त्यापासून बचावासाठी औषध विकसित करण्यावर चित्रपटाची कथा आधारित आहे.विशेष म्हणजे, या चित्रपटात व्हायरस प्रतिबंधासाठी सोशल डिस्टन्स, क्वारंटाईन व आयसोलेशनसारख्या उपायांचा उल्लेख केल्याचे बघावयास मिळते.ते आजच्या घडीला आपण वास्तविकतेमध्ये करीत आहोत.यावरुन करोना व्हायरस भविष्यात पुढे येईल हा भाष त्या चित्रपट दिग्दर्शकाला म्हणा कि निर्मात्याला कसा झाला असेल याची कल्पना करणे अवघड झाले आहे.याचप्रमाणे डीन कुंट्स यांची १९८१ साली प्रसिद्ध झालेली कादंबरी द आय ऑफ डार्कनेसमध्ये जैविक युद्धाचा आजच्या घडीशी मिळता जुळता उल्लेख केलेला पाहायला मिळतो.त्याचप्रकारे अनेक चित्रपटांमध्ये अश्या घटना दाखवल्याचे आपल्याला पाहायला मिळते.
अश्याच सहा चित्रपटांबद्दल आज आपण वाचणार आहोत.
काँटेजीन: २०११ मध्ये आलेल्या या चित्रपटात जैविक विषाणू पसरून कसा विनाश होतो हे दाखविण्यात आले आहे. योगायोगाने या चित्रपटात सुद्धा वटवाघुळामुळे हा विषाणू पसरला असल्याचे दाखविण्यात आले आहे.
माय सिक्रेट टेरेस: २०१८ साली प्रसिद्ध झालेल्या एका प्रसिद्ध दक्षिण कोरियन नाटकाचा हा भाग आहे. यामध्ये कोरोनाला जैविक हत्यार म्हणून दाखविण्यात आले आहे. यात प्रत्येकाला घरात राहण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. म्हणजे सध्या आपण पाळत असलेले सोशल डिस्टंसिंग यात दाखविण्यात आले आहे.
पँडेमिक: २००७ साली आलेल्या या चित्रपटात एका पक्ष्यापासून सुरु झालेला हा संसर्ग कशाप्रकारे पूर्ण लॉस एन्जेलिस शहरात पसरला व नंतर जगभर पसरला हे दाखविण्यात आले आहे. या चित्रपटात विषाणूच्या संसर्गाविषयी अनेक गोष्टी दाखविण्यात आल्या असून सध्या आपण ज्या घटना आपल्या आसपास पाहत आहोत त्या सर्व घटना या चित्रपटात आहेत.
फॅटल कॉन्टॅक्ट: २००६ साली आलेल्या चित्रपटात अमेरिकेत बर्ड फ्लू कसा पसरला हे दाखविण्यात आले आहे. या फ्लू मुळे जगभरात ३५ कोटीपेक्षा जास्त जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचे दाखविण्यात आले आहे.
व्हायरस: १९८० साली आलेल्या या जपानी चित्रपटात इटलीतील विषाणूचा संसर्ग दाखविण्यात आला आहे. ज्यामध्ये जगातील अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचे दाखविण्यात आले आहे. त्याकाळातील जपानमधील हा सर्वात महागडा चित्रपट ठरला होता.
टँगल्ड: २०१० साली रॅपनझूलच्या प्रसिद्ध गोष्टींवर तयार करण्यात आलेल्या या चित्रपटात कोरोनाविषयी अनेक मनोरंजक गोष्टी आहेत. रॅपनझूलचा जन्म कोरोना शहरामध्ये झाला होता असे यात दाखविण्यात आले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तिला क्वारंटाईन करून सुद्धा ठेवण्यात आल्याचं दाखविण्यात आले आहे





