26.3 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ डांबरीकरणाच्या नावावर करोना काळात लुटमार

डांबरीकरणाच्या नावावर करोना काळात लुटमार

सा.बा.विभाग क्र.1 गोंदिया उपविभागाचा प्रताप

0
532

गोंदिया,दि.27: जग करोना संसर्गापासून बचाव करण्यात व्यस्त असताना आणि या बचावासाठी राज्यासह देशात संचारबंदी लागू असल्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून अर्थव्यवस्था खिळखिळी झालेली आहे. त्यातही सरकारने अत्यावश्यक कामांना मंजूरी देत ३३ टक्के निधी खर्चास परवानगी दिली. त्याचा आधार घेत गोंदियाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ च्या वतीने गोंदियातील जिल्हा सामान्य रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय परिसरात डांबरीकरणाचे काम करण्यात आले. त्या कामाकडे बघितल्यास कामाची गुणवत्ता कुठेच दिसून येत नाही.यांसदर्भात त्या विभागाच्या अभियंत्याशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता अभियंते दिवसभर नाॅटरिचेबल होते.blank निधी खर्च करायचा आणि कंत्राटदारासोबत आपला खर्च काढायचा हे बीद्र घेऊनच बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांनी कंत्राटदाराने केलेल्या कामाची तपासणी न करताच काम करु दिले. ४ दिवस लोटत नाही तेच करण्यात आलेले डांबरीकरण पायाने ही थोडेसे कुदरल्यास बाहेर येते. यावरून काळ्या रंगाचा ऑईलमध्ये चुरी मिक्स करुन परिसर डांबरीकरण करण्याचा ड्रामा बांधकाम विभागाने केला आहे. शासकीय कार्यालयाच्या परिसरातही निकृष्ठ काम केले जात असल्याने अधिकाèयांनाही आता चौकशीचे भय राहिले नाही. सया कोतवाल तो डर काहेका असे म्हणत कंत्राटदार, अभियंता व उपअभियंत्यांनी सरकारी तिजोरीवर करोनाच्या काळात डल्ला मारल्याचा केलेला प्रयत्न म्हणावा लागेल. या डांबरीकरणाची सखोल चौकशी एका उच्चस्तरीय अधिकाèयामार्फत आणि गुणवत्तेची तपासणी गोंदिया, नागपूरातील प्रयोगशाळा सोडून मुख्यमंत्र्यांनी करण्याचे निर्देश दयावे आणि यात सहभागी असलेल्या वरिष्ठांपासून सर्वांवर कारवाई करीत कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे काम करावे.