24.5 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home महाराष्ट्र कोविडसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून सुमारे १२३ कोटी खर्च

कोविडसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून सुमारे १२३ कोटी खर्च

0
163

मुंबई, दि.१ : मुख्यमंत्री सहायता निधीत आतापर्यंत ३६१ कोटी ३२ लाख ५७ हजार ५९९ रुपये जमा झाले असून १२३ कोटी ३९ लाख १२ हजार ४१० रुपये कोरोना विषयक विविध कारणांसाठी खर्च झाली आहे. आत्तापर्यंत १ लाख २९ हजार दात्यांनी निधी दिला आहे

औरंगाबाद जवळ रेल्वे अपघातातील मजुरांना ८० लाख, सेंट जॉर्ज रुग्णालयासाठी २० कोटी, ३ कोटी ८२ लाख ५० हजार रुपये कोविड चाचणीसाठी, मजुरांच्या श्रमिक रेल्वेवरील तिकीट खर्चापोटी ९७ कोटी ६९ लाख ५५ हजार ४९० रुपये आणि रत्नागिरी येथील प्रयोगशाळेसाठी १ कोटी ७ लाख ६ हजार ९२० असा निधी दिला आहे.