24.5 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ तो रुग्ण देवरीचा नसून झारखंडचा

तो रुग्ण देवरीचा नसून झारखंडचा

0
457

गोंदिया दि.३१==: ३० मे रोजी नागपूरच्या विषाणू प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालापैकी जिल्ह्यात चार बाधित रुग्ण आढळले. त्यामध्ये गोंदिया तालुक्यातील तीन आणि एक देवरी तालुक्यातील असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. देवरी तालुक्यात जो रुग्ण आढळून आला आहे तो देवरी तालुक्याचा रहिवाशी नसून झारखंड राज्यातील लोहारडागा जिल्ह्यातल्या हिस्सारी या गावचा रहिवाशी आहे.

नाशिक येथून तो ट्रकने झारखंडकडे निघाला असता देवरीनजीकच्या मुरदोली घाटात झालेल्या अपघातात तो जखमी झाला होता.अपघातस्थळावरून त्याला उपचारासाठी देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यानंतर त्याला गोंदिया येथे रेफर करण्यात आले.

गोंदिया येथे त्याच्या घशातील स्राव तपासणीसाठी घेऊन तो नागपूर येथे पाठविण्यात आला. त्याचा विषाणू चाचणी अहवाल ३० मे रोजी पॉझिटिव्ह आला.

देवरी तालुक्यात आतापर्यंत एकही रुग्ण आढळून आलेला नाही. तालुक्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तालुक्यातील नागरिकान्नी घराबाहेर पडू नये.फिजिकल डिस्टनसिंगचे पालन करावे. असे आवाहन देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी केले आहे.