तुमसर,दि.01ः भंडारा जिल्ह्यातील रामटेक-गोंदिया या राज्यमहामार्गावरील मांगली गावाजवळ आज सायकांळच्या सुमारास एका भरधाव वेगाने जाणार्या 12 वर्षीय मुलीला चिरडल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.या अपघातातील चित्र बघून मन हेलावून जाणारे आहे.
सविस्तर असे की रामटेक मार्गे गोंदिया कडे जाणाऱ्यां ट्रक क्रमांक HR55/पी.5857 च्या मालवाहक ट्रकचालकाने भरधाव वेगाने ट्रक चालवित मांगली गावातील किर्ती राजेंद्र फुंडे ही 12 वर्षीय मुलगी सायकलने घराकडे येत असताना तीला जबरधडक देत चिरडले.यात त्या मुलीचा डोक्याचा पुर्ण चेंदामेंदा झाला.घटना घडताच ट्रकचालकाने घटनास्थळावरून फरार झाला.मात्र गावातील नागरिकांनी त्याचा पाठलाग करीत देव्हाडी रेल्वे क्रासींगजवळ ट्रकला अडवून ड्रायवरला ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले.पुढील तपास पोलीस निरीक्षक पिपरेवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस करत आहेत.





