33.9 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता ‘त्या’ गोळीबार प्रकरणात सहा आरोपींना अटक

‘त्या’ गोळीबार प्रकरणात सहा आरोपींना अटक

0
446

गोंदिया,दि.02ःस्थानिक शास्त्री वॉर्डात जुन्या वादातून चक्रधर बोरकर या इसमावर बंदुकीने गोळी झाडून प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी जगदिश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शोधचक्र
फिरवून ६ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून पिस्तुल व ५ जीवंत काडतूस जप्त केली आहे. आरोपींमध्ये विनोद योगेंद्रसिंग जुरेल (४१), रा.मंतर चौक शास्त्री वॉर्ड,अभिषेक उर्पâ दद्दू राजेश बडगे (२५)रा.सुंदरनगर, महेंद्र उर्पâ गोलू रामेश्वर भालेराव (३२) रा.सुंदरनगर, विक्की प्रकाश कांबळे रा.भिमनगर व दोन महिला आरोपींचा समावेश आहे.
शाध्Eाी वॉर्डात २६ मे रोजी दुपारी १ वाजता सुमारास जुन्या वादावरून दोन गटात भांडण झाले. दरम्यान चक्रधर बोरकर हा मध्यस्थी करण्यासाठी गेला असता पिस्तुलने गोळी झाडून त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेची
नोंद गोंदिया शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली. या घटनेतील आरोपी विनोद जुरेल, अभिषेक बडगे, महेंद्र भालेराव या तिघांना त्वरित अटक करण्यात आली. तिघांची कसून चौकशी करून त्यांच्याकडून पिस्तुल व ५ जीवंत काडतूस जप्त करण्यात आले. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार विवेक कांबळेसह दोन महिला असे आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणात एवूâण ६ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची भंडारा कारागृहात
रवानगी करण्यात आली. तपासकार्य जिल्हा पोलिस अधिक्षक मंगेश शिंदे, अप्पर पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी जगदिश पांडे हे करीत आहेत.

blank