35.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ जिल्ह्यात आज दोन नवे रुग्ण ;आणखी चौघांनी केली कोरोनावर मात

जिल्ह्यात आज दोन नवे रुग्ण ;आणखी चौघांनी केली कोरोनावर मात

0
1763

blank

 

गोंदिया दि.२ (जिमाका) :-कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.आज विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालापैकी २ रुग्णांचे कोरोना विषाणू चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बधितांचा एकूण संख्या ६९ इतकी झाली आहे.यामध्ये क्रियाशील रुग्ण २१ आहेत.आज जे रुग्ण आढळून आले आहे त्यामध्ये गोंदिया आणि सालेकसा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

कोविड केअर सेंटर येथे उपचार घेत असलेले ४ रुग्ण आज कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना घरी जाण्यासाठी सुट्टी देण्यात आली. ४८ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.आज कोरोनामुक्त झालेल्या चार रुग्णापैकी दोन रुग्ण अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील आणि गोंदिया व तिरोडा तालुक्यातील प्रत्येकी एक रुग्ण आहे.

पहिल्या बाधित रुग्णाला १० एप्रिल रोजी, दोन रुग्णांना २८ मे रोजी, २५ रुग्णांना २९ मे रोजी. चार रुग्णांना ३० मे रोजी, ३१ मे रोजी ६ रुग्णांना , १ जून रोजी सहा रुग्णांना आणि आज २ जून रोजी ४ रुग्णांना सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत ४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

जिल्ह्यात जे कोरोना बाधित रुग्ण आढळले त्यामध्ये २६ मार्च
(१ रुग्ण),१९ मे (२ रुग्ण) ,२१ मे(२७ रुग्ण) २२ मे(१० रुग्ण), २४ मे ( ४ रुग्ण), २५ मे( ४ रुग्ण ), २६ मे (१ रुग्ण), २७ मे (१ रुग्ण),२८ मे (९ रुग्ण), २९ मे(३ रुग्ण), ३० मे (४ रुग्ण ),३१ मे (१ रुग्ण) आणि आज २ जून रोजी २ रुग्णांचा कोरोना विषाणू चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

जिल्ह्यात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६९ वर पोहचली आहे.आज ज्या दोन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे ते रुग्ण २० ते ३० वयोगटातील आहे.

एकूण १०३० व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने आतापर्यंत नागपूर येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.त्यापैकी ६९ नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ३३ नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित आहे.

जिल्ह्यात एकूण २३ क्रियाशील कंटेंटमेंट झोन आहे.यामध्ये गोंदिया तालुका – नवरगाव/कला, कटंगी, परसवाडा,चुटीया,रजेगाव व गजानन कॉलोनी व काटी. सालेकसा तालूका -धनसुवा.सडक/ अर्जुनी तालुका – तिडका, सालईटोला, रेंगेपार, वडेगाव,पांढरवाणी, गोपालटोली.
गोरेगाव तालुका – गणखैरा, गोरेगाव येथील गंगाराम चौक ,आंबेतलाव तिरोडा तालुका – तिरोडा.अर्जुनी/मोरगाव तालुका – करांडली,अरुणनगर, सिलेझरी ,बरडटोली व अरडतोंडीचा समावेश आहे

जिल्ह्यात विविध शाळा व संस्थांमध्ये ३११९ व्यक्ती आणि गृह अलगीकरणात २२४८ व्यक्ती आहेत.अशा एकूण ५३६७ व्यक्ती अलगीकरणामध्ये आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार वेगाने होत असल्यामुळे प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे.अत्यंत आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे.बाहेर जातांना चेहऱ्याला व तोंडाला मास्क लावावा.असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी केले आहे.

*जीवनावश्यक काहीच नाही…*

*जीवनच..आवश्यक आहे*

blank