29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ निबंध स्पर्धेत गोंदिया जिल्ह्याचे नाव झळकले

निबंध स्पर्धेत गोंदिया जिल्ह्याचे नाव झळकले

0
390

गोंदिया,दि.03ः स्वदेशी जागरण मंच,विदर्भ प्रांत ,महिला विभागाच्या वतीने १० मे २०२० रोजी covid-19 च्या संदर्भात स्वदेशी प्रासंगिकता या विषयावर लॉकडाउनच्या काळात महिलांकरिता ऑनलाईन निबंध स्पर्धा घेण्यात आली.
या विदर्भ स्तरीय स्पर्धेत आपल्या गोंदियाच्या कु.दिशा माणिकराव गेडाम हिने द्वितीय क्रमांक प्राप्त करून गोंदिया जिल्ह्याचे नाव झळकवले. या बद्दल स्वदेशी जागरण मंच,गोंदियातर्फे स्वदेशी वस्तूंचे गिफ्ट हॅम्पर त्यांच्या निवासस्थानी
प्रदान करून अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोंदिया नगर संघचालक मिलिंद अलोणी, डॉ.वंदना मिलिंद अलोणी, स्वदेशी जागरण मंचचे गोंदिया जिल्हा संयोजक गौरव अनिल धोटे,विद्या भारतीच्या गोंदिया जिल्हा सहप्रमुख सुषमा राहुल यदुवंशी आणि राहुल यदुवंशी उपस्थित होते.