गोरेगाव,दि.06ःनगरपंचायत क्षेत्रात गेल्या आठवड्यात कोरोना रुग्ण सापडल्यामुडळे शहरातील जूनी वस्ती परिसर कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. या भागात बहुतांश नागरिक हे शेतकारी व दुग्ध व्यावसाय करणारे आहेत.त्यातच पावसाच्या वातावरणामुळे एका शेतकर्यावर दंड आकारण्यात आल्याने माजी नगराध्यक्ष सीमा कटरे यांनी अन्यायाकारक दंड रद्द कऱण्याची मागणी केली होती.या सर्वबाबींचा विचार करीत तसेच कंटेनमेंट झोनमधील लोकांच्या विविध समस्या नगराध्यक्ष आशीष बारेवार यांनी आमदार विजय राहांगडाले यांच्याकडे पोहचवत या समस्यांवर तोडगा काढण्याची विनंती केली होती.त्यानुसार आमदार विजय राहांगडाले यानी ५ जून ला प्रत्यक्ष भेंट देउन शेतकर्यांशी संवाद साधला.त्यानंतर पंचायत समिती कार्यालयात जिल्हाधिकारी डाॅ.कादबंरी बलकवडे,मुख्य कार्यकारी अधिकारी राजा दयानिधी,गटविकास अधिकारी झामसिंह टेंभरे आदींशी चर्चा केली.
या शेतकरी लोकांना शेतीच्या कामासाठी शेतात जाण्याची परवानणी देण्याची मागणी नगराध्यक्ष आशीष बारेवार यानी केली असता जिल्हाधिकारी यांनी नगर पंचायत गोरेगाव द्वारे तयार करण्यात आलेल्या शेतकर्यांची यादि तहसीलदार गोरेगाव यानी तपासुन सर्वांचे आरोग्य तपासणी करून त्याना परवानगी देण्याचे मौखिक आदेश दिले.
दुग्ध व्यवसाय संबंधी आमदार विजय राहांगडाले यानी विचारणा केल्यावर दुग्ध उत्पादन करनार्या लोकाना कंटेनमेंट झोन मध्ये दूध विक्री करण्याची परवानगी आधिच दिली आहे, या व्यतिरिक्त दिनशॉ कम्पनी कड.ून सुद्धा दूध संकलन करण्याचे कार्य सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.शेतकर्यांच्या जनावरांना चारा उपलब्धते बद्दल उद्भवलेल्या समस्येबाबत नगर पंचायत गोरेगाव द्वारे तयार करण्यात आलेल्या यादीनुसार ३0 लोकांना चारा संकलनासाठी परवानगी तहसीलदार गोरेगाव यानी दिली आहे.यावेळी मुख्याधिकारी हर्षला राणे,न.प.उपाध्यक्ष सुरेश रहांगडाले, नगरसेवक हीरालाल राहांगडाले,भूमेश्वर येल्ले,रेखलाल टेभरे, लक्षमन भगत, संजय बारेवार उपस्थित होते.





