24.6 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ बिरसी विमानतळावरुन कृषीमालाच्या वाहतुकीचे नियोजन करा-खा.मेंढे

बिरसी विमानतळावरुन कृषीमालाच्या वाहतुकीचे नियोजन करा-खा.मेंढे

बिरसी विमानतळ प्राधिकरणाच्या बैठकित निर्देश

0
247

गोंदिया,दि.06ः तालुक्यातील बिरसी गावातील नागरिकांकरिता जागा अधिग्रहण करून त्यांना उपलब्ध करुन देण्यासंबंधीचे निर्देश तसेच पडक्या अवस्थेतील घरे पुन्हा बांधकाम करता यावे व त्यांच्या वस्तूची किंमत निर्धारित करता यावी याकरिता विमान प्राधिकरण व ग्रामपंचायतला संबंधित क्षेत्राचे सर्वेक्षण करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश खा. सुनिल मेंढे यांनी दिले.ते ५ जून रोजी बिरसी विमान प्राधिकरण गोंदिया सल्लागार समिती बैठकीत बोलत होते.ही बैठक बिरसी येथील विमानतळाच्या कार्यालयात खासदार सुनील मेंढे यांच्या अध्यक्षतेत पार पडली.बैठकीत
शेतकर्‍यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने आगामी काळात कृषी उत्पादनांची वाहतूक विमानाद्वारे करण्याच्या उद्देशाने विमान प्राधिकरणद्वारे योजना बनवण्यात यावी. तसेच कृषी अधिकारी यांच्याद्वारे संपूर्ण क्षेत्राचे सर्वे करून नियार्तीसाठी कृषीमालाचा अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले.सोबतच लवकरच बिरसी विमानतळावरुन राज्यात प्रवासी वाहतूक सुरु होणार असल्याचे खा.मेंढे यांनी याप्रसंगी सांगितले.
सदर बैठकीला आमदार विनोद अग्रवाल, बिरसी विमान प्राधिकरण गोंदिया समिती सदस्य डॉ.प्रशांत कटरे, गजेंद्र फुंडे, जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजा दयानिधी, पोलीस अधिक्षक मंगेश शिंदे, बिरसी विमालतळ निदेशक श्री.खंगा व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते.