25.5 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ गोंगले येथे नाला बंडिंग कामाचा आमदार चंद्रिकापुरेच्या हस्ते भूमिपूजन

गोंगले येथे नाला बंडिंग कामाचा आमदार चंद्रिकापुरेच्या हस्ते भूमिपूजन

0
236

सडक अर्जुनी,दि.08ः तालुक्यातील गोंगले/पांढरी येथे जिल्हा परिषद लघू पाटबंधारे उपविभाग आमगाव अंतर्गत नाला बंडींगच्या कुशल वअकुशल कामाचे भूमिपूजन अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला गोंगलेचे सरपंच डि.यु.रहांगडाले,उपविभागीय अभियंता सुभाष कापगते,कनिष्ठ अभियंता शौलेंद्र मेश्राम,श्रीमती भोयर यांच्यासह ग्रामपंचायतचे पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते. कामाचे अंदाजपत्रक २४ लक्ष रूपयाचे असुन कामावर १४० मजुर आहेत.मंजुराना कामाची सर्व माहिती देत किती घन मिटर काम झाल्यावर २०० रूपये रोजी मिळेल ही माहिती मजुरांना द्यावी असे निर्देश आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी दिले.त्यानंतर अभियंता मेश्राम यांनी माहिती सादर केली.