30.7 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ गोंदिया जिल्ह्यात आता केवळ 6 क्रियाशील रुग्ण

गोंदिया जिल्ह्यात आता केवळ 6 क्रियाशील रुग्ण

0
357

गोंदिया दि.8ः.मागील पाच दिवसात कोरोना बाधित रुग्ण जिल्ह्यात आढळून आलेला नाही.उपचारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.जिल्ह्यात एकूण 69 कोरोना बधितांपैकी 63 रुग्ण उपचारातून बरे होऊन घरी परतल्याने जिल्ह्यात आता केवळ सहा रुग्ण क्रियाशील आहे.पाच दिवसांपासून जिल्ह्यात नवीन रुग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले नाही.

जिल्ह्यात पाच रुग्ण आज 8 जून रोजी कोरोनामुक्त झाले आहे.आतापर्यंत 63 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहे.आज जे पाच रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे त्यामध्ये गोंदिया तालुका – 3 रुग्ण,गोरेगाव तालुका -1 आणि झारखंड राज्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या ही जिल्ह्यासाठी निश्चितच आनंदाची बाब आहे.आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णाची एकूण संख्या 69 इतकी आहे. 63 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने आता केवळ 6 रुग्ण कोरोना क्रियाशील आहेत.

जिल्ह्यातील 1097 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 69 रुग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. प्रयोगशाळेकडे आता 32 अहवाल प्रलंबित आहे.जिल्ह्यात एकूण 24 क्रियाशील प्रतिबंधित क्षेत्र आहे.यामध्ये गोंदिया तालुका- 7 , सालेकसा तालूका – 2 सडक/अर्जुनी तालुका – 6 ,गोरेगाव तालुका – 3, तिरोडा तालुका- 1, अर्जुनी/मोरगाव तालुका – 5 चा समावेश आहे.जिल्ह्यातील विविध शाळा व संस्थांमध्ये 2043 आणि गृह अलगीकरणात 1944 अशा एकूण 3987 व्यक्ती अलगीकरणात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी दिली.