30.1 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home गुन्हेवार्ता तक्रारी नंतरही आरोपी मोकाट

तक्रारी नंतरही आरोपी मोकाट

0
749

गोंदिया,दि.09 : गंगाझरी पोलिस ठाण्यांतर्गत सेजगावकला येथे काल (दि.८) सायंकाळी एका आरोपीने गावातील तरासनबाई मनिशंकर पारधी या वृद्ध महिलेवर प्रहार करून तिला जखमी केले. या बाबतची तक्रार गंगझरी पोलिस ठाण्यात करण्यात आली. विशेष म्हणजे पोलिसांनी थातुर मातुर चौकशी करून प्रकरण दाबण्याचा प्रकार सुरू केला आहे. विशेष म्हणजे वृद्ध महिलेवर स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले. आरोपीचे होमगार्ड तसेच पोलिस विभागाशी संबंध असल्याने सदर कारवाई करण्यास पोलिस टाळाटाळ करीत असल्याची माहिती आहे. तेव्हा आरोपीला तत्काळ अटक करावी, अशी मागणी जखमी महिलेच्या मुलाने केली आहे.