भंडारा,दि. 11 :– राज्यात पाचवालॉकडाऊन म्हणजेच अनलॉक सुरु झाला असल्यानेनागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करणे अनिवार्यआहे. परंतु टाळेबंदी शिथील केल्यामुळे नागरिक गर्दीवाढवून सुरक्षित अंतर पाळत नाहीत. तसेच परदेशातूनव रेड झोनमधून जिल्ह्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्यानागरिकांची तपासणी करून प्रत्येक व्यक्तीलासंस्थात्मक क्वारंटाईनमध्येच ठेवावे, होम क्वारंटाईनमध्ये ठेवू नये, असे निर्देश जिल्हाधिकारीएम.जे.प्रदीपचंद्रन यांनी यंत्रणेला दिले.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कायदासुव्यवस्थेसंबंधी जिल्हयातील पोलीस अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषद वनगरपंचायत मुख्याधिकारी तसेच इतर विभागप्रमुखांची बैठक जिल्हा परिषद सभागृहातआयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलतहोते. मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरीएस, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीयअधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, अप्परजिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर, अतिरिक्त पोलीसअधिक्षक अनिकेत भारती, निवासी उपजिल्हाधिकारीशिवराज पडोळे, परिविक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारीमिनल करनवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोदखंडाते,आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके जिल्हायावेळी उपस्थित होते.
चेक पोस्टवरुन अनेक व्यक्ती कामानिमित्तजिल्हयात येत असल्याचे निर्दशनास आले आहे. चेकपोस्टवर तापसणीचे काम चोख करा, असे निर्देश त्यांनीयंत्रणेला दिले. शिथीलता अडचणीची ठरु नये, दिवसेंदिवस गर्दीचे प्रमाण वाढत आहे. यासाठी शहरीभागात मुख्याधिकाऱ्यांनी फुटपॉथवरील
तहसिलदार, गटविकास अधिकारी व मु
उपविभागीय अधिकारी यांनी काँटेनमेंट झोनवरबारीक लक्ष ठेवावे. चेक पोस्टवरील कर्मचारी तसेचकोविड रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दर दोन तासांनीहात सॅनिटाईस करावे किंवा साबनाने धुणे अनिवार्यआहे, अशा सख्त सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी विना परवानगीजिल्हा प्रवेश करणाऱ्या ट्रक व गाडयावर जिल्हयातप्रवेश केल्यास दंड आकारावा. तसेच लोडेड वाहनावरदेखील दंड आकारावा, असे त्यांनी सांगितले.
संस्थात्मक क्वारंटाईनची व्यवस्था तहसिलदारयांचेवर असुन त्याबाबत व्यवस्थापन करा. गृहभेटीदरम्यान वारंवार ताप, सर्दी, खोकला यांची लक्षणेअसलेल्या व्यक्तींची यादी अपडेट करा. जिल्हयातीलआरोग्य सेतू वापर 96 हजार 598 असून ते प्रमाणवाढविण्यासाठी जनजागृती करा, असे यांनी सांगितले.
तात्पुरते शिधापत्रिका देवून सर्व नागरिकांनाअन्नधान्याचा पुरवठा करा. तसेच तात्पुरते शिधापत्रिकाकायमस्वरुपी करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचेआदेश त्यांनी दिले. अपंगत्व प्रमाणपत्र वाटप करा. त्याअनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकारी यांनी आढावाघ्यावा, असे त्यांनी सांगितले. आपत्ती व्यवस्थापनअधिकारी यांनी आरोग्य सेतूबाबत तांत्रिक प्रशिक्षण एकादिवशी दोन तालुके या प्रमाणे घ्यावे. याबाबत जिल्हासूचना अधिकारी त्यांना सहकार्य करतील. तहसिलदार वगटविकास अधिकारी यांनी उपस्थित रहातील, असे तेम्हणाले.
कायदा व सुव्यवस्था, आरोग्य, शिधापत्रिका ,इम्युनिटीकीट, व्हेंटीलेटर, पल्स आक्सीमीटर, सॅम्पल कलेक्शनआदि विषयांचा आढावा घेण्यात आला. टोळधाडप्रार्दुभावाबाबत माहिती कृषी विभागाने दिली.





