
गोंदिया,दि.१३ः उपविभागातंर्गत येत असलेल्या महालगाव येथे २२ फेबुवारी रोजी रात्रीच्यावेळी अवैधरित्या नदी पात्रातून वाळूचे उत्खनन करुन वाहतुक करतांना स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करीत गैरअर्जदार रवि राधेलाल बंभारे व अब्दुल इप्तेखार जब्बार गणी(रा.न्यु लक्ष्मीनगर,गोंदिया)यांचे टिप्पर व जेसीबी जप्त केले होते.त्या प्रकरणात घटनास्थळाचा मौका पंचनामा उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते व तत्कालीन गोंदिया तहसिलदार राहुल घुगे(भाप्रसे),मडंळ अधिकारी व तलाठी यांच्या पथकाने केला असता वाळूचा उपसा करण्यात आल्याचे निदर्शनास आले.त्या उत्खननाची मोजणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करुन घेण्यात आली असता ६८०.७५ वाळूचा उपसा करण्यात आल्याचे उघड झाल्याने गैरअर्जदार रवि बंभारे(धापेवाडा)व अब्दुल इप्तेखार जब्बार गणी न्यु लक्ष्मीनगर गोंदिया विरुध्द ९ जून रोजी १ कोटी १४ लाख ३३ हजार ५५० रुपयाचा दंड आकारण्यात आला आहे.त्याचप्रमाणे पोद्दार इंटरनॅशनल स्कुल बांधकामाकरीता सचिन पालादुंरकर ढाकणी यांनी अवैधरित्या पुरवठा केलेल्या ३५ ब्रास वाळूकरीता ५ लाख ३९ हजार रुपये तर कुडवा येथे लखन बहेलिया,आशिष नागपूरे यांनी अनिकेत बोस यांच्या बांधकामाकरीता ३ ब्रास वाळू व ३० ब्रास मुरुम अवैधरित्या पुरवल्याप्रकरणात १ लाख ९३ हजार २०० रुपयाचा दंड आकारण्याचे आदेश १० जून रोजी उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी काढले आहेत.





