27.4 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ बियर बार धारकांचे आर्थिक शोषण

बियर बार धारकांचे आर्थिक शोषण

0
232

लाखांदूर,दि.15ःकोविड-१९ विषाणूमुळे देशात सर्वत्र बंदी असताना बियर बारची दुकाने देखील बंद पाडण्यात आली होती. मात्र, तीन महिन्यानंतर बियर बार उघडण्याचे शासनाने आदेश निर्गमित केले असताना केवळ शिल्लक दारूची निर्धारित किमतीत विक्री करण्याचे सांगत पाच टक्के विक्रीकर भरण्याचा देखील आदेश केल्याने संबंधित दुकानदारांचे शासनाकडून आर्थिक शोषण केले जात असल्याचा आरोप होत आहेश
देशात कोरोनाने थैमान घातल्याने मागील तीन महिन्यांपूर्वी सबंध देशात जमावबंदी व संचारबंदी लागू करण्यात आले. लॉकडाऊनमध्ये सर्वच दुकाने बंद पाडण्यात आली होती. केवळ जीवनावश्यक वस्तू व औषधी दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. देशी-विदेशी दारूची दुकाने देखील तब्बल तीन महिने बंद पाडल्यानंतर मागील काही दिवसांपासून सुरू करण्यात आली. मात्र, सदरची दुकाने अटी शर्तीवर सुरू केली असताना दुकानात शिल्लक दारूची निर्धारित किमतीत विक्री करावे, दारूचा पुरवठा टाळावा, असे आदेश देण्यात आले.
सदर आदेशानुसार सद्यस्थितीत बियर बारची दुकाने उघडल्या गेली असून शासन निर्देशानुसार निर्धारित किमतीत दारूची विक्रीदेखील केली जात आहे. मात्र सदरची विक्री होताना शासनाने तब्बल तीन महिन्यानंतर उघडण्यात आलेल्या दारू दुकानदारांना पाच टक्के विक्रीकर जून महिन्याच्या अखेरपयर्ंत भरण्याचे आदेश दिले असल्याने संबंधित दुकानदारांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान तीन महिने दारू दुकान बंद राहिल्याने मद्यपींच्या संख्येत घट होतानाच निर्धारित किमतीत दारू विकावी लागत असल्याने संबंधित दुकानदारांना मागील तीन महिन्यापासूनचा विक्रीकर भरणे कठीण झाले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे व आदेशामुळे बियर बार धारकांना मध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत असून आर्थिक शोषण थांबण्या हेतू शासनाने विक्रीक रात सूट द्यावी, अशी मागणी संबंधित दुकानदारांनी केली आहे.