36 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Featured News पेंच, ताडोबा जंगल सफारी १ जुलैपासून होणार सुरू

पेंच, ताडोबा जंगल सफारी १ जुलैपासून होणार सुरू

0
306

blank

नागपूर,दि.16 : लॉकडाऊनमुळे बंद असलेली पेंच, ताडोबातील जंगल सफारी १ जुलैपासून सुरू होणार आहे. त्यानंतर वनउद्याने, व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी सुरू करण्याचे नियोजन वनविभागाने आखले आहे.कोरोनाच्या उद्रेकानंतर मार्चपासून वनउद्याने, व्याघ्र प्रकल्प, अभयारण्यात पर्यटकांना मनाई आहे. लॉकडाऊनच्या काळात व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे स्थानिकांचा रोजगार हिरावला असून, अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. वनविभागानेसुद्धा व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात १ जुलैपासून पेंच, ताडोबा येथे जंगल सफारी सुरू होईल. त्यानंतर मेळघाट, वर्धा येथील बोर अभयारण्य, मुंबई येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री, यवतमाळ येथील टिपेश्वर अभयारण्य, अमरावती येथील बांबू गार्डन सुरू होणार आहे.वनविभागाला कोट्यवधींचा फटकालॉकडाऊनमुळे पेंच, ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी बंद असल्यामुळे गत तीन महिन्यांत वन विभागाचे कोट्यवधींचे उत्पन्न बुडाले आहे. येथे वाघांचे दर्शन व निसर्ग अभ्यासासाठी विदेशी पर्यटकांची होणारी गर्दी थांबली आहे.

blank