गोंदिया,दि.१६ः-गोंदिया जिल्हा परिषदेच्या बांधकाम व अर्थ विभागाच्यावतीने करोना संसर्गाच्या काळात शासन निर्देशाची अवहेलना करीत १०० टक्के कामांचे नियोजन करुन प्रशासकीय मान्यता देत कामाचे करारनामे वाटप केल्याप्रकरणी तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग व लघु पाटबंधारे विभागाची सखोल चौकशी करण्याची मागणी असलेले निवेदन शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.सोबतच त्या निवेदनाची प्रत विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केली असून शिवहरे यांच्या या तक्रारीमुळे जिल्हा परिषदेत खळबळ निर्माण झाली आहे.
शासन करोना संसर्गाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी प्रयत्नरत असतानाच मात्र गोंदिया जिल्हा परिषदेचे सेवा निवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हाशमी यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत नियमबाह्य कामे बांधकाम सभापतीला हाताशी धरुन कंत्राटदारांना वाटप केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.सोबतच शासनाने अत्यावश्यकामाची गरज असेल असे काम व ३३ टक्केपेक्षा अधिक नको या निर्देशाचे पालन केले नसल्याचे म्हटले आहे.जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत राहिलेले एस.ए.ई.हाश्मी हे ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त झाले.मात्र त्यांनी एप्रिल व मे दोन महिने गोंदियात थांबून ३०५४,२५१५,२५५४,जिल्हा निधी,जिल्हा रस्ते दुरुस्ती निधी,१०१/२७/१ जि.प प्रशासकीय इमारत किरकोळ दुरुस्ती व रंगरंगोटी,१०१/२७/९ रस्त्याचे बांधकाम व इतर बांधकामे परिक्षण यात अधिकच्या रुपयाच्या कामांचे प्रशासकीय मान्यता देणे,आदी विविध योजनेतील कामांना ३१ मार्चपुर्वीच्या तारखेत बांधकाम सभापतीना सोबत घेऊन मंजुरी देण्याचे काम करीत कामे विक्रीचा गोरखधंदा केलेल्या तक्रारीची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेतल्याची माहिती शिवहरे यांनी दिली आहे.
जिल्हा परिषद बांधकाम व लपा विभागातील कामाची चौकशी करण्याची शिवहरे यांची मागणी
मुख्यमंत्रीसह विभागीय आयुक्त व जिल्हाधिकार्याना तक्रार





