गोंदिया दि.16 (जिमाका) जगातील काही देश आज कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या विळख्यात सापडले आहे.त्यामुळे जगभर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.अलीकडे जिल्ह्यात देखील दररोज आढळून येणाऱ्या बाधित रुग्णांमुळे चिंता वाढली आहे.आज नवीन 15 रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात एकूण बधितांची संख्या 101 इतकी झाली आहे.जिल्ह्यात आता 32 क्रियाशील रुग्ण आहेत.
सहा दिवसापूर्वी कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आखाती देशात रोजगारासाठी गेलेले जिल्ह्यातील लोक परत जिल्ह्यात येत असल्यामुळे हे लोक चाचणी अहवालावरून कोरोना संसर्ग बाधित असल्याचे दिसून येत आहे.
आज 16 जून रोजी गोंदिया येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून प्राप्त चाचणी अहवालातून सलग पाचव्या दिवशी देखील रुग्ण आढळून आले आहे.तब्बल 15 रुग्ण कोरोना बाधित असल्याचे अहवालावरून दिसून आले आहे.
पाच दिवसात 32 रुग्ण आढळून आले आहे.जिल्ह्यातील प्रत्येकाने कोरोनाची बाधा होणार नाही यासाठी काम नसतांना घराबाहेर पडू नये. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. चेहऱ्यावर व नाकावर बाहेर ठिकाणी वावरतांना मास्क बांधावा.वारंवार हात साबण व पाण्याने स्वच्छ धुवावे,तसेच हात धुण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करावा.शारीरिक अंतर ठेवून उभे राहावे आणि स्वतःची काळजी घ्यावी.
जिल्ह्यात आता कोरोना क्रियाशील रुग्णांची संख्या 32 झाली आहे. आज जे 15 रूग्ण आढळून आले आहे त्यामध्ये तिरोडा तालुक्यातील तेरा रुग्ण आणि गोंदिया तालुक्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात मागील पाच दिवसात आढळून आलेल्या बाधित व्यक्ती ह्या आखाती देशातून जिल्ह्यात दाखल होताच त्यांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले.त्यामुळे त्यांचा संपर्क जिल्ह्यात बाहेर इतरांशी न आल्यामुळे इतर कोणीही त्यांच्यामुळे बाधित झालेले नाही.
आज आढळुन आलेले 13 रुग्ण हे तिरोडा तालुक्यातील आहे.ते आखाती देशातून जिल्ह्यात आले आहेत. दोन रुग्ण हे गोंदिया तालुक्यातील आहे.ते रुग्ण दिल्ली येथून आले आहेत.दोन्ही तालुक्यातील व्यक्ती ह्या जिल्ह्यात आल्यावर संस्थात्मक अलगीकरणात होत्या.आज आढळून आलेले 15 रुग्ण हे 20 ते 50 वर्ष वयोगटातील आहे.
पाच दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा कोरोनामुक्त झालेला गोंदिया जिल्हा आखाती देशात रोजगारासाठी गेलेले जिल्ह्यातील लोक परत जिल्ह्यात आल्याने पुन्हा बाधित झाला आहे.
जिल्ह्यात 26 मार्चला पहिला बाधित रुग्ण,19 मे रोजी दोन रुग्ण, 21 मे रोजी सत्तावीस रुग्ण,
22 मे रोजी दहा रुग्ण, 24 मे रोजी चार रुग्ण, 25 मे रोजी चार रुग्ण, 26 मे रोजी एक रुग्ण, 27 मे रोजी एक रुग्ण, 28 मे रोजी नऊ रुग्ण, 29 मे तीन रुग्ण, 30 मे रोजी चार रुग्ण, 31 मे रोजी एक रुग्ण, 2 जून रोजी दोन रुग्ण,12 जून रोजी एक रुग्ण ,13 जून रोजी एक रुग्ण, 14 जून रोजी एक रुग्ण,15 जून रोजी 14 रुग्ण आणि आज 16 जून रोजी 15 असे एकूण 101 रुग्ण कोरोना बाधित आढळलेे आहे.
कोरोना बाधित आढळून आलेले 101 रुग्ण हे तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. अर्जुनी/मोरगाव तालुका – 31,सडक/अर्जुनी तालुका – 10, गोरेगाव तालुका – 4, आमगाव तालुका -1, सालेकसा तालुका – 2, गोंदिया तालुका – 22 आणि तिरोडा तालुका – 31 रुग्ण आहेत.
जिल्ह्यातील 1368 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यामध्ये 101 रुग्ण कोरोना बाधित आढळले. अद्याप 39 नमुन्यांचा चाचणी अहवाल गोंदिया येथील विषाणू प्रयोगशाळेत प्रलंबित आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंत 69 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.आज नवीन 15 कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 101 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आता 32 क्रियाशील कोरोना बाधित रुग्ण आहेत.
जिल्ह्यात विविध शाळा व संस्थांमध्ये 1159 आणि घरी 1677 असे एकूण 2836 व्यक्ती अलगीकरणात आहे.
*घरीच राहा*
*काळजी घ्या*
*सुरक्षित राहा*





