30.1 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ रब्बी पिकाच्या धानाचे चुकारे त्वरीत द्या-विवेक मेंढे

रब्बी पिकाच्या धानाचे चुकारे त्वरीत द्या-विवेक मेंढे

0
445

गोरेगाव,दि.17ःराज्यसरकारने शासकीय आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत खरेदी केलेल्या रब्बी पिकातीला धान खरेदीचे चुकारे अद्याप न दिल्याने खरीपाच्या तयारीला लागलेल्या शेतकर्याला आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची वेळ आल्याने रब्बी धान खरेदीचे चुकारे त्वरीत देण्याची मागणी अर्जुनी मोरगाव युवक काँग्रेस माजी विधानसभा अध्यक्ष विवेक मेंढे यांनी केली आहे.सोबतच रब्बीच्या धानाला बोनस देण्यात यावे.खरीपाच्या हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धानाचे जानेवारी महिन्यापासूनचे चुकारे रखडले असून महाराष्ट्र स्टेट मार्केटिंग फेडरेशनच्या वरिष्ठांनी याकडे लक्ष घालून जानेवारी महिन्यातील चुकारे शेतकर्यांना का मिळाले नाही याची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.सोबतच रब्बीच्या हंगामातील धान खरेदीचे चुकारे देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करुन शेतकर्यांना न्याय द्यावे असे मेंढे यांनी म्हटले आहे.