अर्जुनी मोरगाव,दि.19ः तालुक्यातील जमिन सुपिक असल्यामुळे तालुक्यातीलल शेतकरी सर्वत्र धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. मात्र दिवसें-दिवस शेतीपुरक वस्तुंच्या किमती गगनाला भिडल्याने कर्जबाजारी होवुन शेतकरी शेती करीत आहे. ता दुसरीकडे कोरोना मुले हि शेतकऱ्यांची कबरमोड झालेली आहे. त्यामुळे धानाच्या अवलंबून असणाऱ्या शेतक-यांचे खरीप हंगामातील धानाला घोषीत झालेला बोनस पाहुनच शासकीय धान खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात धानाची विक्री केली. धानावरील बोनस लवकर-लवकर मिळणार म्हणुन यावर्षी खरीपाच्या हंगामात पैशाची अडचण येणार नाही अशी शेतक-यांची अपेक्षा होती. परंतु जवळपास सहा महिन्याचा कालावधी लोटुन गेला देखील शेतक-यांच्या खात्यामध्ये बोनस जमा झाला नसल्यामुळे शेतकरी खरीप हंगामात धानाचे उत्पादन कसे घेणार या गंभीर चिंतेत शेतकरी पडलेला आहे. शेतकऱ्यांकडून शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या धानाची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना दर दिवशी देण्यात येते. परंतु अधिका-यांमध्ये बोनस वाटपबाबत कुठलेही समन्वय नसल्यामुळे बोनस वाटपामध्ये दिरंगाई होत आहे. असे शेतक-यांनी निदर्शनास आणुन दिलेले आहे. तरी आपण जातीने लक्ष घालुन मोरगाव अर्जुनी तालुक्यातील शेतक-यांना तसेच जिल्ह्यातील इतर तालुक्यातील शेतक-यांना ज्यांना अजुनही खरीप हंगामाचे बोनस मिळाले नाही अशा सर्व शेतक-यांना तातडीने बोनस देण्याबाबत संबंधित अधिका-यांना आदेश देण्यात यावे. अशी मागणी माजी पालकमंत्री तथा आमदार डॉ. परिणय फुके यांनी प्रसाशनाला केली आहे.





