30.1 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home गुन्हेवार्ता ट्रॅक्टर-अ‍ॅम्ब्युलन्सची धडक; चार जखमी

ट्रॅक्टर-अ‍ॅम्ब्युलन्सची धडक; चार जखमी

0
688

आमगाव,दि.20: तालुक्यातील गोंदिया- आमगाव जिल्हा मार्गावर असलेल्या ठाणा गावाजवळील गोरेगाव वळणावर शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर आणि मिनी एंबुलेंसमध्ये समोरासमोर भीषण धडक होऊन चारजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.ही धडक इतकी भीषण होती की, मारुती ओम्नी मिनी एंबुलेंस गाड़ी क्रमांक एमएच- 49/बी के-1522 च्या ड्राइवरसाइडचा हिस्सा क्षतिग्रस्त होऊन गाड़ी चालकाच्या पायाला मोडला गेला. अपघातग्रस्त वाहन सहयोग नेत्रालयाची आहे. अपघातात ट्रैक्टर चालकासह चार व्यक्ती जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी गोंदिया येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आमगांव पोलीस निरीक्षक श्याम काळे यांनी अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती दिली व अपघाताची नोंद केली आहे, घटनेचा तपास सुरू केले आहे.