31.3 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home गुन्हेवार्ता विद्युत धक्याने चिचगड परिसरात दोघांचा मृत्यू

विद्युत धक्याने चिचगड परिसरात दोघांचा मृत्यू

0
830

चिचगड,दि.22ः- चिचगड पोलीस ठाणेंतर्गत रविवारला ओमेश साखळ(रा.उचेपूर) या 24 वर्षीय युवकाचा विद्युत शाॅक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली तर आज सोमवारल झाशीनगर येथे विद्युत खांबाच्या अर्थिंगतारेला हात लागल्याने निताराम ऋषी मेश्राम(वय 42) याचा शेतशिवारात मृत्यू झाल्याची घटना घडली.मेश्राम यांच्या मागे 2 मुले व आप्तपरिवार आहे.मेश्राम ज्या शेतशिवारात गेले त्याठिकाणावरुन उच्चदाबाची विद्युत वाहिनी कमी दाबाची विद्युत वाहिनीचे तार गेले असून एक तार तुटून पड़ल्याने त्याचा अर्थिंगशी संपर्क आल्याने ही घटना घडल्याचे बोलले जाते.