24.9 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home राजकीय विजेच्या बिलाने मोडले नागरिकांचे कंबरडे-शिवसेनेचे निवेदन

विजेच्या बिलाने मोडले नागरिकांचे कंबरडे-शिवसेनेचे निवेदन

0
3406

तुमसर,दि.23 : कोरोना काळात सरासरी आलेल्या भरगच्च विजेच्या बिलाचे सध्या विद्युत विभागाकडे नियोजन नसल्याचे समजते. त्यात मागील चार महिन्याचे लागून आलेले बिल व त्यातील भरमसाठ रकमेने सर्व नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. कोरोना काळात मीटर रिडींगची नोंद विभागाने केली नाही. मात्र चालू महिन्यात विद्युत विभागाने सरासरी रिगिंडचे बिल पाठवले आहे. प्रत्येकाच्या बिलातील रक्कम ही हजाराच्या वर दिसून येत आहे. कोरोना प्रादुभार्वाच्या संकटकाळात केंद्र सरकार आणि राज्य शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील कष्टकरी नागरिक हे जवळपास तीन महिने घरी बसून आहेत. त्यांचे उत्पन्नाचे सर्व मार्गच बंद आहेत, काहीतरी मार्ग काढून या संकटाच्या काळात आपले जीवन जगत आहे.
ज्यांची रोजची हातावरची पोट आहेत, ज्यांचे मासिक कमाई सर्व खाण्यामध्येच खर्च होत असते. जवळ काहीच शिल्लक नसते. त्यांचे उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे खायचे हाल होत असल्याने घरगुती विद्युत बिल माफ करावे. याविषयीचा निवेदन शिवसेना शिष्टमंडळाच्या वतीने विद्युत विभागाला देण्यात आला. यावेळी शिवसैनिक उपस्थित होते.